World Productivity Day 2023 : जागतिक उत्पादकता दिवस साजरा करण्याचं महत्त्व तुम्हाला माहित का ?

| Updated on: Jun 20, 2023 | 12:59 PM

तुम्हाला कुठे उत्पादकता कमी आहे असं वाटतं असेल, तर ते तुम्ही ओळखू शकता. विशेष म्हणजे ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.

World Productivity Day 2023 : जागतिक उत्पादकता दिवस साजरा करण्याचं महत्त्व तुम्हाला माहित का ?
World Productivity Day 2023
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आज जागतिक उत्पादकता दिवस (World Productivity Day 2023) आहे. संपूर्ण जगात उत्पादकता दिवस हा 20 जून रोजी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. विशेष म्हणजे आजच्या दिवशी लोकांना त्यांचं उत्पादन (Productivity Day) कसं वाढवायचं हे सांगितलं जातं, त्याचबरोबर उत्पादन कसं वाढवायचं याचं ट्रेनिंग सुध्दा दिलं जातं. कोणतंही उत्पादन वाढलं पाहिजे ही भूमिका असल्यामुळे आजचा दिवस साजरा (World Productivity Day Celebration) केला जातो.

या कारणामुळे ऑनलाईन विनामूल्य सत्र…

हा उत्सव अधिक प्रसिद्ध नाही. जागतिक उत्पादकता दिवस साजरा करणे हे केंद्रस्थानी नाही. परंतु आजच्या दिवशी उत्पादकता साधने, प्रशिक्षण आणि प्रगतीच्या पुरवठादारांचं योगदान या गोष्टी साजऱ्या करण्याचा दिवस आहे. काही कंपन्या आजच्या दिवशी खरंतर त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन विनामूल्य सत्र आयोजित करतात.

व्यवसाय करीत असताना जास्तीत जास्त फायदा उत्पादनातून कसा होईल, यासाठी उत्पादकता दिवस साजरा केला जातो. सगळ्या उत्पादनामध्ये कशी वाढ होईल, त्यासाठी ऑनलाईन चर्चा सत्र आयोजित केली जातात. चॉलकेट किंवा इतर छोट्या कंपन्यांना त्याचा अधिक फायदा होतो.

हे सुद्धा वाचा

तुम्ही करीत असलेला व्यवसाय उत्पादन वाढवण्यासाठी कोणती पाऊले उचलतं आहात. त्यासाठी तुम्हाला किती संधी सध्या उपलब्ध आहेत. तुम्हाला उत्पादन पुरणाऱ्या कंपन्यांचे आभार माना, काही असे कर्मचारी आहेत, ते अडचणीच्या काळात अधिक मदत करतात.

जागतिक उत्पादकता दिवस साजरा करण्याचं महत्त्व

जी लोकं तुम्हाला उत्पादन तयार करायला मदत करतात, त्यांचा विचार करुन आजचा दिवस साजरा केला जातो. मुळात तुमचा व्यवसाय कायम तेजीत ठेवण्यासाठी रोज असंख्य लोकं मेहनत घेतात. त्या लोकांचे आणि छोट्या कंपन्यांचे आभार मानले जातात. तुमची संपूर्ण व्यवसाय प्रक्रिया पाहा. त्यामध्ये कुठे कमतरता आहे, हे जाणून घ्या. त्याच्यात बदल करा आणि उत्पादन वाढवा.

तुम्हाला कुठे उत्पादकता कमी आहे असं वाटतं असेल, तर ते तुम्ही ओळखू शकता. विशेष म्हणजे तो सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.