नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याचं हेलिकॉप्टर सोमवारी रात्रीपासून बलुचिस्तान (Balochistan) परिसरात बेपत्ता झालं होतं. त्या हेलिकॉप्टरचे अवशेष (Helicopter wreckage) आज बलुचिस्तानातीलच मूसा गोथ इथं मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत पाकिस्तानी सैन्याच्या 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय. त्यांचे मृतदेहही मिळाले आहेत. इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे (Bad weather) ही दुर्घटना घडलीय. पाकिस्तानी सैन्यानं जारी केलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह 6 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय.
ISPR च्या डीजींनी ट्वीट करुन सांगितलं की लासबेला जिल्ह्यातील मूसा गोथ मध्ये एका हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. यात लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह सर्व सहा अधिकारी आणि सैनिकांचा मृत्यू झालाय. त्यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात ही दुर्घटना खराब हवामानामुळे झाल्याचं समोर आलं आहे.
A Pakistan army aviation helicopter which was on flood relief operations in Lasbela, Balochistan lost contact with ATC. 6 individuals were on board including Commander 12 Corps who was supervising flood relief operations in Balochistan. Search operation is underway.DTF
— DG ISPR (@OfficialDGISPR) August 1, 2022
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की पाकिस्तानी सैन्यातील जवानांच्या मृत्यूने देश दुखी आहे. देशाला लेफ्टनंट जनरल सरफराज अली आणि पाकिस्तानी सैन्याचे 5 अन्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूने संपूर्ण देश दु:खात आहे. ते पूरग्रस्तांना मदतकार्य पोहोचवण्याचं काम चांगलं काम करत होते. देश या सुपूतांचा सदैव ऋणी राहील.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पाकिस्ताने सैन्याकडून माहिती देण्यात आली की बलुचिस्तानच्या लासबेलामध्ये पूरग्रस्तांची मदत करणारं पाकिस्तानी सैन्याचं एक हेलिकॉप्टर बेपत्ता झालं आहे.
The Wreckage of unfortunate Pakistan Army helicopter which lost contact with ATC yesterday while on flood relief operations found in Musa Goth, Windar, Lasbela. All 6 officers / soldiers on board including Lieutenant General Sarfraz Ali Commander 12 Corps embraced shahadat. pic.twitter.com/g9YkVvU3EH
— Hamid Mir (@HamidMirPAK) August 2, 2022
आयएसपीआरने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर 12वी कोअर कमांडर जनरल सरफराज अली आणि अन्य 5 वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना घेऊन गेलं होतं. बलुचिस्तानातील पूरस्थितीचा आढावा आणि मदतकार्याची पाहणी या हेलिकॉप्टरद्वारे केली जात होती. मदतकार्य सुरु असताना ATC शी असलेला हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. यात कमांडर 12 कोअर सह 6 अधिकारी होते.