नवी दिल्लीः जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) या फुटीरतावादी संघटनेचा प्रमुख यासिन मलिक (Yasin Malik) याला टेरर फंडिंगप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर दिल्लीच्या एनआयए न्यायालयाकडून निर्णयही राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच यासिनला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आणि तसेच घडलेही. तरीही एनआयएकडून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.
हा निर्णय राखून ठेवल्यानंतरच कोर्टरूमकडून त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. फाशीच्या शिक्षेविषयी त्याला ज्यावेळी विचारण्यात आले होते, त्यावेळी त्यांने स्पष्ट सांगितले होते की, शिक्षेवर मी काहीही बोलणार नाही. न्यायालयाला योग्य वाटेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असं त्यानं सांगितलं होतं.
यासिन मलिकला शिक्षा जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. त्याच्या या शिक्षेबाबत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी, यासिन मलिकची पत्नी पत्नी मुशाल हुसैन मलिक (मुशाल हुसैन मलिक) (Mushal Hussain Malik) मात्र तिच्या पतीला म्हणून ती पाठिंबा देत आहे.
पाकिस्तानमधील कराची येथे राहणाऱ्या मुशाल हुसैनचा जन्म 1986 मध्ये एका सधन कुटुंबात झाला. त्या दोघांची पहिली भेट 2005 मध्ये पाकिस्तानत झाली होती. त्यावेळी यासीन काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत होता. आणि त्याचवेळी तो या संदर्भात पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांकडून या मिशनसाठी पाठिंबाही मागत होता. यादरम्यान यासीनचे भाषण झाले. त्याच्या त्या भाषणामुळेच मुशाल खूप त्याच्या वक्तव्याला प्रभावित झाली आणि त्याच्याकडे आकर्षिली गेली. त्यावेळी तिने त्याचे तोंडभरुन कौतूकही केले. भाषणामुळे त्याचा ऑटोग्राफ घेतला आणि त्या दोघांची त्या क्षणापासूनच त्यांची खरी प्रेमकहाणी सुरू झाली.
मुशाचे वडील एमए हुसेन हे पाकिस्तानचे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत, आणि आई रेहाना पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या नेत्या आहेत. यासीन आणि मुशालची प्रेमकहाणी अनेक वर्षे सुरु होती. त्यादरम्यान दोघांच्या माता हज यात्रेदरम्यान एकमेकांना भेटल्या आणि त्यांच्या लग्नाची तारीख त्यांनी निश्चित केली. 22 फेब्रुवारी 2009 रोजी यासिनने पाकिस्तानी कलाकार मुशाल हुसैनसोबत लग्न केले. आणि काही महिन्यांनी त्यांना मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी रजिया सुलतान असे ठेवले.
काश्मीरला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या यासीन मलिकचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी श्रीनगरमधील मैसुमा येथे झाला. यासीनचे वडील गुलाम कादिर हे सरकारी बस चालक आहेत. तर यासीनचे शालेय शिक्षण श्रीनगरमधून झाले. काश्मीरला मुक्त करण्यासाठी यासीनने 80 च्या दशकात ‘ताला पार्टी’ स्थापन केली. आणि याच पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काश्मीरमध्ये द्वेषाची बीजं पेरायला सुरुवात केली.