मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने ( NASA ) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळू शकते असा इशारा दिला आहे. या पृथ्वीवर कोसळविण्याच्या कामात जरा देखील चूक झाली तर मोठे नुकसान होऊ शकते असे नासाने म्हटले आहे. नासाच्या एरोस्पेस सेफ्टी एडव्हायझरी पॅनलने या स्पेस स्टेशनला पृथ्वीवर आणण्याची तयारी सुरु केली आहे. या स्पेश स्टेशनला साल 1998 मध्ये रशिया, कॅनाडा आणि जपान सह जगातील 20 देशांनी मिळून अंतराळात संशोधनसाठी पाठविले होते. या अंतराळ स्थानकाला 15 वर्षांसाठी पाठविले होते. तरीही ते अजूनपर्यंत काम करीत आहे. आता त्याला पृथ्वीवर आणण्याची तयारी सुरु आहे. या अंतराळ स्थानकात 200 हून अधिक अंतराळवीर जाऊन राहून आले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन एक अशी कृत्रिम संरचना आहे ते पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरत असते. या अंतराळ स्थानकात पृथ्वीवरून पाठविलेले अंतराळवीर अनेक प्रयोग करून अंतराळातील रहस्यं सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 410 किलोमीटर अंतरावर आहे. 109 मीटर लांबीच्या या अंतराळ स्थानकाचे वजन 4 लाख 50 हजार किलो आहे. ते एका फुटबॉल मैदानाएवढे आहे. 15 कोटी डॉलरपासून तयार केलेले हे अंतराळ स्थानक जगातीस सर्वात महागड्या गोष्टीपैकी एक आहे.
मेन्टेनन्सनंतर देखील हे स्पेस स्टेशन अंतराळात चांगले काम करीत असेल तर नासा त्याला जमीनीवर का आणत आहे.? असा सवाल तुमच्या मनी आला असेल. वास्तविक नासाला या स्थानकाला आणखी काही वर्षे अंतराळात ठेवायचे आहे. परंतू असे करण्यासाठी मेन्टनन्सची गरज लागेल. तसेच धोके देखील वाढतील. यासाठी हजारो कोटींचा खर्च येईल. अमेरिकेने अलिकडेच आपल्या अंतराळ बजेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आणखी दुरुस्तीच्या फंद्यात न पडता त्याला थेट खाली आणण्याची तयारी सुरु आहे.
नासाच्या मते याला खाली आणण्याची तयारी सुरु आहे. यात कोणतेही नुकसान होऊ नये याचा प्रयत्न आहे. जर कोणतीही हलगर्जी झाली तर पृथ्वीवासियांना मोठा फटका बसु शकतो. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला नासा पॉइंट नेमावर पाडणार आहे. ही अशी जागा जेथे सॅटेलाईटना पाडले जाते.
अंतराळ स्थानकाचा आकार मोठा आहे. त्यामुळे त्याला खाली खेचताना थोडी देखील चुक फार मोठे नुकसान करेल. त्यामुळे नासा त्यासाठी योग्या प्लानिंग करीत आहे. यासाठी स्पेस टगचा वापर करण्यात येणार आहे. स्पेश टग म्हणजे अंतराळ टग स्पेस स्टेशनला पृथ्वीच्या वातावरणात ढकलून देईल. त्यामुळे त्यांचे ज्वलन होण्यास सुरुवात होईल आणि प्वाईंट निमो या जागेवर ते समुद्रात कोसळेल.
या स्पेस स्टेशनमध्ये अनेक हायटेक सुविधा आहेत. त्यात अनेक स्वयंचलित उपकरणे आहेत. ती अंतराळवीरांना अनेक माहिती पुरवितात. या हायटेक कॅमेऱ्यांसह सेंसर लावले आहेत. याच्या मदतीने स्पेस स्टेशन, ग्लोबल वार्मिंग, नैसर्गिक संकटे आणि वातावरणात होणारे बदल या बद्दल नवनवीन माहीती मिळत असते.