ना विटा ना दगड, असे तयार झाले स्वस्त घरं; देशातील पहिला असाही एक पोस्ट ऑफिस

| Updated on: Aug 20, 2023 | 3:20 PM

साधारण एक हजार स्वेअर फूट घर तयार करण्यासाठी १२ महिने लागतात. परंतु, नवीन पोस्ट ऑफिस तयार करण्यासाठी फक्त ४४ दिवस लागले.

ना विटा ना दगड, असे तयार झाले स्वस्त घरं; देशातील पहिला असाही एक पोस्ट ऑफिस
Follow us on

3D Concrete Printing Technology: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरूमध्ये ३ डी प्रिंटिंगपासून तयार झालेल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले. ३ डी टेक्निकपासून तयार झालेलं हे देशातलं पोस्ट ऑफिस आहे. हे कार्यालय बेंगळुरूच्या उल्सूर बाजारात तयार करण्यात आले आहे. हे घरं तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली पद्धती ही विशेष आहे. साधारण एक हजार स्वेअर फूट घर तयार करण्यासाठी १२ महिने लागतात. परंतु, नवीन पोस्ट ऑफिस तयार करण्यासाठी फक्त ४४ दिवस लागले.

३ डी प्रिंटिंग टेक्निक काय आहे?

३ डी टेक्निक पद्धतीने हे पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले आहे. हे घरं स्वस्त आणि टिकाऊसुद्धा आहे. 3 डी टेक्निकचं नाव ऐकूण तुम्हाला वाटेल याचं कनेक्शन प्रिंटरशी आहे. परंतु, पूर्णपणे असं नाही. या पद्धतीमध्ये रोबोटिक्सच्या माध्यमातून भिंत, छत आणि जमीन तयार करण्यात आली. मशीनला जसे निर्देश दिले जातात, तसं ऑटोमॅटिक हे तयार होतं. मशीन घर तयार करण्यासाठी सपोर्ट करते.

YouTube video player

साधारण घरं तयार करण्यासाठी विटांचा वापर केला जातो. परंतु, ३ डी प्रिंटिंगने ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, कमी वेळात अशी घरं तयार करता येतात. विटांपासून घरं तयार करण्यासाठी बराच वेळ जातो.

अशी काम करते टेक्निक

नकाशा तयार करून घर तयार केला जातो. ३ डी पद्धतीत असं नाही. सर्वकाही काम्प्युटरने तयार होते. कम्प्युटरमध्ये नकाशा फिट होतो. त्यानुसार रोबोटिक्सच्या मदतीने ऑटोमॅटिक घर तयार होते. भिंतीची लांबी रुंदी किती, आतमध्ये काय राहील. हे सर्व रोबोटिक्स सिस्टीम तयार करते.

३ डी प्रिंटर काही मशीन मिळून तयार होते. मिक्सर, पम्पिंग युनीट, मोशन असेम्ब्ली, ऑपरेटिंग सॉफ्टवेअर, फीडिंग सिस्टीम हे सर्व त्याचे भाग आहेत. यातून घर तयार होते. प्रिंटरच्या मदतीने मटेरीयल निघतो. त्यातून इमारत तयार होते.

स्वस्त आणि मजबूत

भविष्यात कमी खर्चात चांगला घर तयार केला जाऊ शकतो. कमी वेळात हे घर तयार होते. खर्च कमी लागतो. शिवाय घर मजबूतही होतो. देशात या पद्धतीचा वापर केला जातोय. आयआयटी मद्रासने मागील सप्टेंबर महिन्यात असं घर तयार केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयआयटी गुवाहाटीने भारतीय सेनेच्या जवानांसाठी थ्री डी प्रिंटेड मॉड्यूलर कांक्रीट चौकी तयार केली होती.