घामापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. शरीराच्या ज्या भागात तुम्हाला खूप घाम येतो त्या भागावर बटाट्याचे तुकडे चोळा.
जास्त घाम येत असेल तर रोज आंघोळ करण्याची सवय लावा. तसेच आंघोळीपूर्वी पाण्यात दोन चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा, त्यानंतर या पाण्याने आंघोळ करा.
रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश करा, तसेच टोमॅटोचा रस प्या. त्यामुळे जास्त घाम येण्याची समस्या कमी होते.
तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक कप ग्रीन टीचा समावेश करा. यामुळे घामावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते.
दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. यामुळे तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल, तसेच घामामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. (वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. कृपया प्रथम त्यासंबंधित तज्ञाशी संपर्क साधा.)