Aadhaar Card : ‘आधार’ तेरे कई नाम ! आधार हाच ओळखीचा पुरावा

| Updated on: Apr 25, 2022 | 3:04 PM

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने रहिवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी आधारचे विविध प्रकार सुरू केले आहेत. बँकिंग, मोबाइल फोन आणि सरकारी आणि बिगर सरकारी सेवांच्या सुविधा मिळवण्यासाठी आधार फायदेशीर आहे.ई-आधारप्रमाणेच (e-Aadhaar) एमएआधारही प्रत्येक आधार नोंदणी किंवा अपडेटसोबत आपोआप तयार होतो आणि तो मोफत डाऊनलोड करता येतो.

Aadhaar Card : आधार तेरे कई नाम ! आधार हाच ओळखीचा पुरावा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

केवायसी पडताळणी (KYC verification) आणि प्रोफाइल (Profile) राखण्यासाठी कंपन्या आणि सरकारी संस्थांद्वारे आधार कार्डचा (Aadhaar card) वापर केला जातो. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) रहिवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी आधारचे विविध प्रकार सुरू केले आहेत. बँकिंग, मोबाइल फोन कनेक्शन आणि सरकारी आणि बिगर सरकारी सेवांच्या सुविधा मिळवण्यासाठी आधार फायदेशीर आहे. आधार सेवा केंद्रामध्ये आठवड्याचे सर्व दिवस आधारशी संबंधित सेवा उपलब्ध असतात. प्रत्येक कार्डची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. ई-आधारप्रमाणेच mAadhaarही प्रत्येक आधार नोंदणी किंवा अपडेटसोबत आपोआप तयार होतो आणि तो मोफत डाऊनलोड करता येतो. uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in आधार क्रमांक, व्हर्च्युअल आयडी किंवा नोंदणी आयडीचा वापर करून 50 रुपये भरून ऑनलाइन ऑर्डर करता येईल. आधार पीव्हीसी कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या पत्त्यावर पोहोचवले जाते.

Aadhaar Letter

प्राधिकरणाने जारी केलेले आधार पत्र लॅमिनेटेड असते. यात क्यूआर कोडसह (QR Code) ज्या दिवशी हे कार्ड देण्यात आले, त्या तारखेची नोंद आणि प्रिंट डेट असते. नवीन नोंदणी किंवा अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावत (Biometric Update) असल्यास सामान्य पोस्टाद्वारे रहिवाशांना आधार पत्र मोफत पाठवले जाते. आधार कार्ड हरवल्यास किंवा नष्ट झाल्यास रहिवाशांना प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून 50 रुपयांत या कार्डचे ऑनलाइन पुनर्मुद्रण करता येईल. पुनर्मुद्रित आधार पत्र स्पीड पोस्टद्वारे रहिवाशाला पोहोचवले जाते.

mAadhaar

हे प्राधिकरणाने विकसित केलेले एक अधिकृत मोबाइल अ ॅप आहे, जे मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केले जाऊ शकते. गुगल प्ले स्टोअर किंवा आयओएसवरून mAadhaar अॅप डाऊनलोड करता येणार आहे. हे आधार कार्डधारकांसाठी CIDRकडे नोंदणीकृत आधार तपशीलांना इंटरफेस प्रदान करते.ज्यात फोटोसह लोकसंख्याशास्त्रीय (Demographic) माहिती आणि आधार क्रमांक समावेश आहे. यामध्ये ऑफलाइन पडताळणीसाठी आधार सुरक्षित क्यूआर कोड देण्यात आला आहे. ई-आधारप्रमाणेच (e-Aadhaar) mAadhaar ही प्रत्येक आधार नोंदणी किंवा आपोआप अद्ययावत तयार होतो आणि कार्ड मोफत डाऊनलोड करता येतो.

ईआधार (eAadhaar) हा आधारचा इलेक्ट्रॉनिक प्रकार आहे, ज्यावर प्राधिकरणाने डिजिटल स्वाक्षरी केली आहे. यामध्ये इश्यू डेट आणि डाऊनलोड डेटसह ऑफलाइन व्हेरिफिकेशनसाठी आधार सिक्युराइड क्यूआर कोड देण्यात आला असून हा पासवर्ड संरक्षित आहे. ई-आधार/आधारचा वापर करून प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक सहजरीत्या अद्ययावत करू शकता. हा ई-आधार डाऊनलोड करता येणार आहे. ई-आधारमध्ये आधार क्रमांकाचे केवळ शेवटचे 4 अंक दाखवले आहेत. प्रत्येक आधार नोंदणी किंवा अद्ययावतीकरणासह ई-आधार स्वयंचलितपणे तयार केले जाते आणि विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.

Aadhaar PVC Card

आधार पीव्हीसी कार्ड हा प्राधिकरणाने पीव्हीसी-आधारित आधार कार्डद्वारे सादर केलेला आधारचा नवीनतम प्रकार आहे ज्यात डिजिटल स्वाक्षरी केलेले आधार सुरक्षित क्यूआर कोडसह आहे. यात छायाचित्रे आणि लोकसंख्याशास्त्रीय तपशील आहेत. uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in आधार क्रमांक, व्हर्च्युअल आयडी किंवा नोंदणी आयडीचा वापर करून 50 रुपये भरून ऑनलाइन ऑर्डर करता येईल. आधार पीव्हीसी कार्ड स्पीड पोस्टद्वारे आपल्या पत्त्यावर पोहोचवले जाते.

भारतीय सैन्याच्या सामर्थ्याला बळ! AK-47 रायफलचे अपग्रेड व्हर्जन हाती, खासियत जाणून घ्या

उंच आकाशात विमान उडाल्यानंतर मागे पांढऱ्या रेषा का तयार होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Netflix वर सर्च करणे झाले अधिक सोप्पे; नवीन डिझायन आले समोर