मुंबई : कोंबडीचे मांस आणि अंडी हे आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. अंड्यांमध्ये प्रोटीन, अमिनो अॅसिड, अ जीवनसत्व, ब-12 जीवनसत्व, ई जीवनसत्व तसेच अनेक पोषक घटक असतात. आहारात अंड्यांचा समावेश असणे हे आपले शरीर तसेच स्वास्थासाठी फायद्याचे आहे. (do you know how many eggs hen can lay know all information)
आपल्याला स्वास्थ जपायचे असेल तर आहारात अंड्यांचा समावेश जरुर असावा. अंड्याचे सेवन केल्यामुळे मेंदूची काम करण्याची क्षमता वाढते. तसेच डोळ्यांची दृष्टीसुद्धा वाढते. अंडी खाल्ल्यामुळे शरीरातील हाडांनासुद्धा बळकटी येते. मात्र, सर्वगुणसंपन्न असलेले हेच अंडे कोंबडी वर्षभरातून किती वेळा देते असावी, याची कधी कल्पना केली आहे का ?
मांसाहार करणाऱ्या प्रत्येकाच्या आहारात अंड्यांचा समावेश असतो. अनेकजण अंडे चवीने खातात. मात्र, कोंबडी एका वर्षातून कितीवेळा अंडे देते याबद्दल अनेकांना माहिती नाही. याच शंकेचे समाधान करण्यासाठी पोल्ट्री वैज्ञानिक डॉ. एयू किदवई यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या एका वर्षामध्ये 305 से 310 अंडी देतात. म्हणजेच पोल्ट्री फार्ममधील एक कोंबडी एका महिन्यात 25 ते 26 अंडी देते. ही संख्या कमीअधिक होऊ शकते.
पोल्ट्री फार्ममधील कोंबडीच्या तुलनेत एक गावरान कोंबडी एका वर्षात फक्त 150 ते 200 अंडी देते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना ज्या पद्धतीने आहार दिला जातो, कोंबड्यांचे ज्या पद्धतीने पालन केले जाते, त्यावरुनसुद्धा कोंबडीची अंडी देण्याची क्षमता बदलत राहते. एक कोंबडी तिच्या आयुष्यात 75-80 आठवड्यांपर्यंत अंडी देऊ शकते. काही संकरीत कोंबड्या तब्बल 100 आठवड्यांपर्यंतसुद्धा अंडी देतात.
दरम्यान, जगात सर्वांत जास्त कोंबडीचे अंडे खाल्ले जातात. त्यामुळे भारतातसुद्धा अनेक व्यावसायिक पोल्ट्रीफार्मींग करण्यास उत्सुक असल्याचे आपल्याला दिसते. कुक्कुटपालन केल्यानंतर अंडी बरोबरच मांसविक्रीसुद्धा करता येते, त्यामुळे या व्यवसायाकडे लोकांचा कल वाढतो आहे.
इतर बातम्या :
आईच्या मोबाईलमध्ये आमच्या आठवणी, प्लीज परत द्या, माय गमवलेल्या लेकीचं आर्त पत्र
VIDEO | कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी
(do you know how many eggs hen can lay know all information)