प्रत्येक भागाची एक वेगळी गंमत असते. त्याचं वेगळंपण असतं. पण भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असंही एक गाव आहे, ज्या ठिकाणचं वेगळेपण काही औरच आहे. या ठिकाणच्या बायका म्हाताऱ्याच होत नाही. त्या म्हातारपणातही अत्यंत सुंदर दिसतात. त्यांचं वय असतं 80 वगैरे वगैरे… पण त्यांना पाहिल्यावर त्या पंचवीशी आणि तिशीतील असतात. बरं हे तर काहीच नाही, या बायका कधीकधी आजारीही पडत नाही. आता बोला. या गावाचं पाणीचं न्यारं म्हणायचं की वारं न्यारं म्हणयाचं? कुठे आहे हे गाव? काय खातात? कसे राहतात या गावची लोकं? आम्ही तुम्हाला तीच गंमत सांगणार आहोत.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या डोंगराळ भागात हुन्जा खोरे आहे. या ठिकाणी हा आदिवासी समाज आहे. हुन्जा घाटी ही भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर आहे. या आदिवासी जमातीचं वैशिष्ट्ये म्हणजे या जातीतील लोक अत्यंत सुंदर आणि तरुण दिसतात. या समुदायातील महिला 65 आणि 70 व्या वर्षीही तरुण दिसतात. विशेष म्हणजे या वयातही या महिला मुलांना जन्म देतात.
हुन्जा गाव हिमालयातील पर्वत रांगेत आहेत. या गावाला जग छत नावानेही ओळखते. भारताच्या उत्तरेकडे हे गाव आहे. या ठिकाणी भारत, पाकिस्तान, चीन आणि आफगाणिस्तानच्या सीमाही लागतात. या आदिवासी समुदायाची संख्या 87000 आहे. या आदिवासी समुदायाची जीवनशैली अत्यंत जुनी आहे.
गिलगित-बाल्टिस्तानच्या डोंगरात हे गाव आहे. या ठिकाणी हुन्जा आदिवासी समुदायाचे लोक राहतात. या गावातील महिलांचं आयुर्मान सरासरी 110 ते 130 एवढं असतं. काही लोक तर 150 वर्षही जगतात. या ठिकाणी राहणारे लोक वयाच्या 70व्या वर्षीही 20 वर्षाचे दिसतात. तर पुरुष 90व्या वर्षीही बाप बनतात. या लोकांचं खास वैशिष्ट्ये म्हणजे हे लोक क्वचितच आजारी पडतात. या ठिकाणचे लोक गोरेपान, हसतमुख आणि तरूण असतात. हे लोक रोज 15 ते 20 किलोमीटर पायी चालतात. तसेच हे लोक आपल्याच समुदायात लग्न करतात.
या गावातील लोक स्वत: उगवलेल्या भाज्या खातात. हे लोक खुबानी आणि उन्हात सुकवलेले अक्रोड खूप खातात. ज्वारी, बाजरी आणि कुट्टु मोठ्या प्रमाणावर खातात. दिवसातून फक्त दोन वेळा ते जेवण करतात. हे लोक अलेक्झांडर सिकंदरच्या काळातील आहे. जेव्हा सिकंदर जग जिंकायला निघाला होता, तेव्हा हे लोक त्यांच्यासोबत आले होते. त्यानंतर हे लोक काश्मीर खोऱ्यात थांबले. त्यामुळे त्यांच्या आदिवासी समूहाच्या नावावरूनच ते राहत असलेल्या ठिकाणाला हुन्जा घाटी हे नाव पडलं.