मुंबई : दूध आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या जीवनात आपण दुधाचे सेवन करतो. दुधाव्यतिरिक्त आपण दुधापासून तयार होत असलेले दही, लोणी, तूप, ताक, लस्सी, चीज, पनीर, आईस्क्रीम, क्रीम इत्यादी पदार्थही मोठ्या प्रमाणात वापरतो. उन्हाळ्याच्या काळात दूध खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपण खबरदारी म्हणून उन्हाळ्यात दिवसातून किमान 3-4 वेळा दूध उकळत असतो. याशिवाय पुढील काही दिवसांमध्ये दूध वापरण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतो. त्याचप्रमाणे दुधापासून बनवलेल्या इतर वस्तूही खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. तथापि, तूप आणि लोणी आपण सर्वसाधारण तापमानात ठेवू शकतो. ते सहसा खराब होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत दूध व दुधापासून तयार होणारे इतर दुग्धजन्य पदार्थ का खराब होतात, ते खराब होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)
घरी आणलेले दूध उकळण्यास उशीर झाल्यास ते फुटते, परंतु असे का होते? दूध फुटण्यामागचे कारण जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहित असले पाहिजे की दूध नेहमीच 20 ते 25 अंश इतक्या तापमानात खराब होण्याची चिन्हे अधिक असतात. जर घरात ठेवलेले दूध जास्त वेळ उकळलेले नसेल तर काही तासांत ते फुटते. जर दुधाचा वापर बराच काळ करायचा असेल तर प्रत्येक 4-5 तासांच्या अंतराने ते उकळवावे किंवा ते फ्रीजमध्ये ठेवावे. जास्त तापमान आणि कमी तापमानात ठेवलेले दूध लवकर फुटत नाही.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की दूध फुटणे अर्थात खराब होणे हे त्या दुधाच्या शुद्धतेची ओळख आहे. दूध भेसळयुक्त असेल तर ते लवकर फुटत नाही. शुद्ध दूध अनेक गोष्टींनी बनलेले आहे. त्यात चरबी, प्रथिने आणि साखर असते. दुधामधील प्रथिने कोलोइडल सोल्यूशनमध्ये निलंबित केले जातात. प्रथिनाचे लहान-लहान कण दुधात तरंगतात व एकमेकांपासून अंतर ठेवतात. दुधामध्ये असलेल्या प्रथिनाच्या कणांमधील हे अंतर दुधाला फुटण्यापासून वाचवते. परंतु जेव्हा दूध उकळत नाही किंवा बराच काळ फ्रीजमध्ये ठेवत नाही तर त्यावेळी दुधाची पीएच पातळी कमी होऊ लागते.
दुधाची पीएच पातळी जसजशी कमी होत जाते, तसतसे प्रथिने कण एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. कोणत्याही पदार्थाची पीएच पातळी कमी व्हायला लागते, त्यावेळी ते आम्लपित्त होते. त्याचप्रमाणे जेव्हा दुधाची पीएच पातळी कमी होण्यास सुरुवात होते, तेव्हा तेसुद्धा आम्लपित्त होऊ लागते. त्यामुळे दूध फुटते. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)
मोदींचे विश्वासू ते मोदी मंत्रिमंडळातून डच्चू, प्रकाश जावडेकरांना का हटवलं?https://t.co/GzF0vrlnT8#PrakashJavadekar | #PMNarendraModi | #NarayanRane | #kapilpatil | #BJP | #ModiCabinetExpansion | #ModiCabinet | #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
इतर बातम्या
Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच