मुंबईः गेल्या काही काळापासून बुलेटप्रूफ कॉफी पिण्याचा ट्रेंड वाढला आहे. हा अनेक सेलिब्रिटींच्या आहाराचा भाग (Part of the diet) आहे. कॉफीचा हा प्रकार बराच काळ वापरात असला तरी नंतर त्याचे नाव बुलेटप्रूफ कॉफी (Bulletproof coffee) असे ठेवण्यात आले. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, हिमालयीन प्रदेशात राहणारे लोक ही कॉफी बर्याच काळापासून पीत आहेत. तिथं बनवल्या जाणाऱ्या कॉफीमध्ये बटरचा वापर केला जातो. म्हणूनच याला बटर कॉफी असेही म्हणतात. जास्त उंचीवर राहणारे लोक या प्रकारचे पेय अधिक वापरतात. बुलेटप्रूफ कॉफी म्हणजेच, कॉफीमध्ये बटर आणि MCT तेल मिसळून बनवलेले एक नवीन पेय आहे. तिबेटमध्ये ही कॉफी खूप लोकप्रिय आहे. या कॉफीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जाणून घ्या, ही कॉफी बनवण्याची पद्धत (Method of making) आणि कॉफी पिण्याचे फायदे.
रिपोर्टनुसार, हिमालयातील शेर्पा आणि इथियोपियातील गुरेझ समुदाय अनेक शतकांपासून कॉफीमध्ये बटर वापरत आहेत. जास्त उंचीच्या भागात राहणारे लोक जास्त उर्जा मिळवण्यासाठी त्यांच्या कॉफी किंवा चहामध्ये बटर घालतात, कारण जास्त उंचीच्या भागात राहणे आणि काम केल्याने त्यांच्या कॅलरीची गरज वाढते. याशिवाय, नेपाळ आणि भारतातील हिमालयीन प्रदेश तसेच चीनमधील काही प्रदेशातील लोक सामान्यतः बटरपासून बनवलेला चहा पितात. त्याच वेळी, बटर चहा, किंवा पोचा, तिबेटमधील एक पारंपारिक पेय आहे.
बटर कॉफीचे बुलेटप्रूफ कॉफीमध्ये रूपांतर करण्याचे श्रेय अमेरिकन उद्योजक डेव्ह एस्प्रे यांना जाते. त्याची सुरुवात त्यांनी 2013 मध्ये केली. त्याचा बुलेटशी काहीही संबंध नसला तरी त्याला फक्त बुलेटचे नाव देण्यात आले आहे. सध्या अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडामध्ये ही कॉफी अधिक ट्रेंडमध्ये आहे. भारतात त्याची लोकप्रियता वाढत आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटींच्या आहारात बुलेटप्रूफ कॉफीचा समावेश आहे.
बुलेटप्रूफ कॉफी हा किटो डाएट चे पालन करणाऱ्या लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तज्ज्ञांनी याचे अनेक फायदे सांगितले आहेत, पण जर तुम्ही ते नियमितपणे पिण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच त्याचे सेवन करा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि कॉफी शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. बटरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. अशा प्रकारे बुलेट कॉफीचे अनेक फायदे सांगितले आहेत.