नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन मानले जाते. लांबपल्ल्यांच्या प्रवासासाठी रेल्वे देशातील सर्वात स्वस्त प्रवासाचे साधन आहे. देशभरात दररोज दोन कोटीहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी ट्रेनचे तिकीट किंवा पास काढणे पुरेसे असते. परंतू तुम्ही कधी असे ऐकले आहे का ? भारतीय रेल्वेच्या देशातील एका स्थानकात जाण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट आणि व्हीसाची गरज लागते. पासपोर्ट आणि व्हीसा शिवाय तुम्ही या स्थानकात प्रवेश देखील करु शकत नाही. पाहा कोणते हे रेल्वे स्थानक आहे ?
भारतीय रेल्वेच्या पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यात अटारी श्याम सिंह रेल्वे स्थानकात जाण्यासाठी व्हीसाची आवश्यकता लागते. तसेच या स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानच्या परवानगीची गरज लागते. तुम्हाला वाटेल की जर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेचे आहे. तर तेथे जाण्यासाठी पाकिस्तानच्या परवानगीची का आवश्यकता आहे ? याचे कारण म्हणजे अटारी रेल्वे स्थानकातून पाकिस्तानसाठी ट्रेन जाते. त्यामुळे या स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानाच्या परवानगीची गरज लागते. जर तुम्ही अटारी रेल्वे स्थानकात विना पासपोर्ट आणि व्हीसा शिवाय प्रवेश केला. तर पकडल्यानंतर तुम्हाला 14 फॉरेन एक्ट म्हणजे व्हीसाच्या इंटरनॅशनल हद्दीत बेकायदा शिरकाव केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अटक देखील होऊ शकते.
अटारी रेल्वे स्थानकातून एकमेव समझौता एक्सप्रेस चालत होती. या ट्रेनच्या तिकीटासाठी तुम्हाला पासपोर्ट दाखवावा लागतो. जर ही ट्रेन लेट झाली तर पाकिस्तान आणि भारत दोन्ही देश रजिस्टरमध्ये ट्रेन एण्ट्री लिहीतात. 8 ऑगस्ट 2019 रोजी या रेल्वे स्थानकाला बंद करण्यात आले आहे. त्यानंतर समझौता एक्सप्रेसला देखील बंद करण्यात आले आहे. या समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर ही ट्रेन बंद करण्यात आली आहे.