नवी दिल्ली : मलिक तेजानी यांनी शूजच्या दुकानात काम केले. स्वतःचा ब्रँड विकसित करण्याचे स्वप्न पाहिले. मलिक यांची कंपनी मेट्रो आज देशातील मल्टी ब्रँड फूटवेअर चैन आहे. देशातील ३० राज्यात १४७ शहरांत मेट्रो फूटवेअर पोहचले आहे. देशभरात ६४४ स्टोअर आहेत. मेट्रो फक्त शूजसाठी नाही. तर याच्याशी संबंधित एक्सेसरीजसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी शूज ही कंपनी तयार करते. शूज पॉलीस लिक्वीड, सँडल्ससह कितीतरी एक्सेसरीज ही कंपनी तयार करते. जाणून घेऊया मेट्रो या फूटवेअर कंपनीच्या प्रवासाबद्दल.
मलिक ब्रिटीश सरकारमध्ये शूज विकण्याचे काम करत होते. पन्नासाव्या दशकात मलिक तेजानी यांनी एका शूजवेअरमध्ये काम करणे सुरू केले. हे काम करत असताना त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार करण्याचे स्वप्न पाहिले. त्यानंतर ती कंपनी त्यांना सोडावी लागली.
हळूहळू हे ब्रँड मुंबईतील लोकांना पसंत येऊ लागले. सन २००० कंपनीसाठी टर्निंग पॉइंट बनला. या दरम्यान मेट्रोने आपला ब्रँड मोची लाँच केला. कंपनीने मोचीच्या शोरूमपर्यंत फूटवेअर सीमित ठेवला नाही.
पर्स, बेल्ट, मोबाईल केस, फूटकेअर आणि शूकेअर प्रॉडक्टही तयार करून दिले. सध्या देशातील ५० पेक्षा जास्त शहरात मोचीचे १५० आऊटलेट आहेत.
यानंतर कंपनीने एकापाठोपाठ एक कलेक्शन सादर केले. कंपनीने व्हॅल्यू फॉर मनी आणि वॉकवे कलेक्शन सादर केले. हा असा कलेक्शन होता ज्यामुळे ग्राहकांना बजेटनुसार वस्तू मिळत होत्या.
हळूहळू त्यांनी एकानंतर एक कलेक्शन सादर केले. कंपनीने देशात १०० स्टोअर सुरू करण्याचे ध्येय ठेवले. २०१५ मध्ये मेट्रोने अमेरिकेचे ब्रँड क्रॉक्ससोबत टायअप केले. याशिवाय २०२० पर्यंत देशात ५५० आउटलेट सुरू करण्याची घोषणा केली.
मलिक यांच्यानंतर त्यांच्या मुलाने रफीकने कंपनी सांभाळली. सध्या रफीक मेट्रो कंपनीचे चेअरमन आहेत. फराह मलिकसुद्धा कंपनीशी जुळलेल्या आहेत. त्या सध्या मेट्रो ब्रँड्स लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.