या शहरात कार खरेदी करण्यासाठी घ्यावी लागते परवानगी, कारण…

| Updated on: Aug 08, 2023 | 9:53 PM

या शहरात कार चालवता येत नाही. कार घरीसुद्धा ठेवता येत नाही. सरकारनं कारवर पूर्णपणे बॅन आणलंय.

या शहरात कार खरेदी करण्यासाठी घ्यावी लागते परवानगी, कारण...
Follow us on

बहुतेक जणांकडे कार आहे. बहुतेक लोकं कार चालवतात. कार चालवणे हे एक फॅशन झालंय. रस्ते चांगले असल्यास लोकं त्याठिकाणाहून कार चालवतात. त्यामुळे रस्त्यावर जामही लागते. शिवाय प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होते. दिल्ली सरकारने आड-इव्हन पद्धती सुरू केली होती. परंतु, तुम्हाला ही बातमी वाचून धक्का बसेल. असंही एक शहर आहे ज्या शहरात कार चालवण्यासाठी परवानगीची गरज पडते. शहरात कारवर पूर्णपणे बॅन आणलं गेलंय. या शहरात कार चालवता येत नाही. कार घरीसुद्धा ठेवता येत नाही. सरकारनं कारवर पूर्णपणे बॅन आणलंय.

ट्रेनची सुविधा

हे घडतं ते स्वीत्झर्लंडमधील जरमॅट शहरात. स्वीत्झर्लंडला पृथ्वीचा स्वर्ग म्हणतात. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जरमॅट शहरातील नगरपालिकेने खासगी लोकांना कार ठेवण्यास बंदी आणली आहे. शहरात राहणारे लोकं कोणत्याही प्रकारची कार ठेवू शकत नाही. ये-जा करण्यासाठी त्यांना सार्वजनिक वाहतूक सुविधेचा वापर करावा लागतो. ट्रेनची सुविधा पुरवली जाते.

काही लोकांना नियमात सुट

परंतु, काही लोकांना नियमात सूट देण्यात आली आहे. त्यात टॅक्सीचालक आणि बिल्डर यांचा समावेश आहे. याशिवाय खासगी कार चालवायची असेल, तर नियम तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागते.
परवानगी मिळाल्यानंतर कार खरेदी करता येते. त्यासाठीही नियम तयार करण्यात आले आहेत. सरकारने तयार केलेली छोटी कार खरेदी करावी लागते. नियमानुसारचं रस्त्यावर चालवावे लागते.

या कारणामुळे झाला नियम

सरकारनिर्मित कारने जायचे असेल तर विशिष्ट रस्त्यानेचं जावे लागते. हा रस्ता विशिष्ट पद्धतीने तयार केला आहे. शहर प्रदूषणमुक्त राहावं आणि शहराची सुंदरता कायम राहावी, यासाठी नगरपालिकेने हे नियम तयार केले आहेत.

आपल्याकडे मात्र कार पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. शिवाय प्रदूषित शहर झालीत तरी काही फरक पडत नाही. पण, कार बिनधास्तपणे घेऊ शकता आणि चालवूसुद्धा शकता.