या पाच देशांचे चलन जगात सर्वात कमजोर, पाहा कोणते देश यादीत आहेत ?

| Updated on: Sep 06, 2023 | 7:35 PM

भारतीय रुपया घसरला अशा बातम्या आपण वाचत असतो. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची परिस्थिती पाहून आपण नाराज होतो. परंतू जगात असेही देश आहेत त्यांचे चलन आपल्या रुपयापेक्षाही कमजोर आहे.

या पाच देशांचे चलन जगात सर्वात कमजोर, पाहा कोणते देश यादीत आहेत ?
currencies
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलरशी नेहमीच तुलना केली जाते. नेहमीच रुपया घसरल्याच्या बातम्यावाचून आपण आपल्या रुपयाचं किती अवमुल्यन झाले याची काळजी करीत असतो. परंतू जगात असेही काही देश आहेत, ज्याचं चलन आपल्या भारतीय रुपयापेक्षाही कमी आहे. यात अशा देशांचा समावेश आहे ज्या देशांची अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेत कमजोर आहे. चला पाहूया कोणत्या देशांचे चलन आपल्या भारतीय रुपयापेक्षाही कमजोर आहे. अशा पाच देशांची माहिती खालील प्रमाणे आहे.

इराण

इराणचे चलन जगातील सर्वात कमजोर चलनापैकी एक आहे. इराणच्या चलनाला रियाल म्हटले जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की आपला भारतीय एक रुपया 516 इराणी रियालच्या समान आहे. या देशात नोकरीची संधी खूप कमी आहेत. तसेच इराणमध्ये दरडोई नागरिकांचे उत्पन्न कमी आहे. येथील अर्थव्यवस्था केवळ शेती आणि तेलावर आधारित आहे.

व्हीएतनाम

व्हीएतनाम एक असा देश आहे जो अंतर्गत कलहासाठी ओळखला जातो. येथील करन्सीला म्हणजेच चलनाला व्हीएतनामी डोंग म्हणतात. जी जगातील दुसरे कमजोर चलन आहे. एका भारतीय रुपयांत 284 व्हीएतनामी डोंग खरेदी करु शकतो. आता व्हीएतनामची अर्थव्यवस्था हळूहळू वाढत आहे. असा अंदाज आहे की साल 2024 मध्ये व्हीएतनामची अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

सिएरा लियोन

सिएरा लियोन पश्चिम आफ्रीकेतील सर्वात मागासलेल्या देशांपैकी एक आहे. येथे एसएलएल करन्सी चालते. एक भारतीय रुपयासाठी 278 एसएलएल खर्च करावे लागते. म्हणजे भारतात एक चॉकलेट घेण्यासाठी देखील 278 एसएलएल खर्च करावे लागती. या देशाची करन्सी जगातील तिसरी सर्वात कमजोर करन्सी आहे.

लाओस

जगातील चौथे सर्वात कमजोर चलन लाओसची आहे. येथील चलनाला लाओ किंवा लाओटियन किप ( LAK ) देखील म्हटले जाते. येथील 212 लाओ एक रुपयांच्या बरोबर आहे. सध्या या देशीच अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. येथील 50 टक्के इकॉनॉमी शेतीवर अवलंबून आहे. तर 40 टक्के औद्योगिक आणि 10 अन्य सेवावर आधारित आहे.