Visa Free Countries : फॉरेन ट्रिपचं स्वप्न होणार पूर्ण…! ‘या’ देशांमध्ये भारतीयांना मिळणार व्हिसामुक्त प्रवेश

| Updated on: Jan 11, 2025 | 5:55 PM

Visa Free Countries : आपल्यापैकी प्रत्येकाल फॉरेन ट्रिप करण्याची इच्छा असते. परंतु व्हिसाचा अर्ज करण्यासाठी लांब रांगेत उभे राहणे कोणालाही आवडत नाही. आता, मात्र चिंता नोको जगामध्ये असे 57 देश आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हिसा लागणार नाही. चला जाणून घेऊया या देशांची नावं.

Visa Free Countries : फॉरेन ट्रिपचं स्वप्न होणार पूर्ण...! या देशांमध्ये भारतीयांना मिळणार व्हिसामुक्त प्रवेश
Follow us on

आजकाल फॉरेन ट्रिपचं प्रत्येकाचे स्वप्न असते. आयुष्यामध्ये एकदा तरी विदाश दौरा झालाच पाहिजेल हे अनेकांचे स्वप्न असतं. विदेशामदधील विविध देशांमध्ये जाणं तिथे जाऊन तिथल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदेशात जास्त दिवस फिरायला जाणं. परंतु विदेशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वचे डॉक्युमेंट्स म्हणजे पासपोर्ट आणि व्हिसा. व्हिससा मिळवणं कोणत्याही व्यक्तीसाठी वटतं तेवढ सेपं नही. व्हिसा मिळवण्याससाठी सर्वप्रथम व्हिसासाठी अर्ज करावा लागतो, त्यानंतर तुमची मुलाखात घेतली जाते आणि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला व्हिसा मंजूर होण्यासाठी वाट पाहावी लागते.

अनेकवेळा डॉक्युमेंट्सच्या कमतरतेमुळे किंवा अनेक कारणांमुळे अनेकांचा मंजूर होत नाही. असा परिस्थितीमध्ये अनेकांचे स्वप्न भंग होते. पंरतु आता काळजी करण्याची गरज नाही. आपल्या जगामध्ये असे काही देश आहेत जिथे जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते. तुमच्याकडे जर भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्ही या देशामध्ये फिरण्यास पात्र ठरते. हेन्ली पासपोर्ट पॉवर इंडेक्सनुसार, भारतीय पासपोर्ट रँकिंगमध्ये १२२व्या स्थानावर आहे. त्यामुळे जगात असे ५७ देश आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हिसा लागत नाही.

भारतीयांसाठी व्हिसा फ्रि देश

बारबाडोस, भूतान, बोलीविया, ब्रिटिश व्हर्जिन आयसलॅण्ड्स, बुस्र्न्दी, कंबोडिया, केप वर्डे बेट, कोमोरो बेट, कुक आयलँड्स, जिबूटी, डोमिनिका, इथियोपिया, फिजी, ग्रेनेडा, गिनी-बिसाऊ, हैती, इंडोनेशिया, ईरान, जमैका, जॉर्ड, कझागिस्तान, केनिया, किरिबाती, लाओस, मकाओ (एसएआर चीन), मेडागास्कर, मलेशिया, मालदीव, मार्शल बेट, मॉरिटानिया, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मोंटेसेराट, मोझाम्बिक, म्यानमार, नेपाळ, नियू, पलाऊ बेट, कतार, रवांडा, समोआ, सेनेगल, सेशल्स, सेरा लिओन, सोमालिया, श्रीलंका, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट लूसिया, सेंट व्हिसेंट आणि ग्रेनेडाइन्स, तंजानिया, थायलंड, तिमोर-लेस्ते, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुवालू, वानुअतु, जिम्बाब्वे.

तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असल्यास, तुम्हाला या देशांमध्ये फिरण्यास व्हिसासाठी अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही या देशांना सहज फिरू शकता आणि तिकडच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. या 57 देशांपैकी लोकांना मालदीव, थायलंड, मॉरिशस, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये अनेकांना सुट्टीसाठी जायला आवडते.

विदेशात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

1)व्हिसा-मुक्त देशांची यादी वेळोवेळी बदलते.
2)प्रवास करण्यापूर्वी नवीनतम माहितीसाठी परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाइट पहा.
3)काही देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा आहे.
4)फिरायला जाण्यापूर्वी प्रवास विमा घेणे चांगले असते.