जगभरात लक्झरी, आलिशान हॉटेल्सची काहीच कमतरताा नाहीये. त्यांच्या एका दिवसाचं भाडंच लाखो रुपयांमध्ये असतं. पण आज आपण जगातील सर्वात आलिशान आणि अत्यंत महागड्या हॉटेलबद्दल जाणून घेणार आहोत. या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं हे कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे सर्व सुखसोयी उपलब्ध असलेलं हे हॉटेल जमिनीवर नव्हे तर चक्क पाण्यात आहे. हे हॉटेल नक्की कुठे आहे, आणि त्याचं भाडं किती आहे, ते जाणून घेऊया.
आलिशान हॉटेल
जगातील अनेक देशांमध्ये आज फाईव्ह किंवा सेव्हन स्टार हॉटेल्स आहेत, त्यात अनेक सुख-सुविधा उपलब्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल.
त्या हॉटेलच्या एका दिवसाच्या भाड्याची किंमत ऐकाल तर तुम्ही अवाक् व्हासल. तिथे एक दिवस राहण्याचे भाडे इतके आहे की तुम्ही त्या किंमतीत अनेक लक्झरी कार खरेदी करू शकता.
पाण्यातील हॉटेल
अतिशय विलक्षण गोष्ट म्हणजे सुख-सोयींनी सज्ज असे हे आलिशान हॉटेल जमिनीवर नव्हे तर चक्क पाण्याखाली आहे. तिथे तुम्हाला पर्सनल स्टाफ तसेच खासगी कुक (स्वयंपाकी) मिळतो. एवढंच नव्हे तर फिरण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेच हेलीकॉप्टरची सुविधा देखील उपलब्ध असून इतरही अनेक सुख-सविधा आहेत.
कुठे आहे हे हॉटेल ?
आज आपण या हॉटेलबद्दल जाणून घेऊया. द लव्हर्स डीप नावाने प्रसिद्ध असलेलं हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे. कारण हे हॉटेल पाणबुडीत आहे आणि कॅरिबियन बेटर सेंट लुसिया येथे आहे. इथे राहण्याचा एक उत्तम वेगळा अनुभव आहे. जे लोक येथे राहतात त्यांना पाण्याखालील आकर्षक नजारे पाहायला मिळतात, मात्र त्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो.
किती आहे भाडं ?
जगभरातील सर्वात आलिशान आणि महागडं हॉटेल हे म्हणजे एक अंडरवॉटर सबमरीन ( पाणबुडी) आहे. अतिशय विलक्षण , रोमँटिक अनुभव देण्यासाठी पाणबुडीतील हे हॉटेल डिझाईन करण्यात आले आहे. इथे थांबन सुख-सोयींचा आस्वाद घेण्यासाठी पैसेही तगडेच मोजावे लागतात. इथलं एका दिवसांच भाडं वाचून तुमचे डोळेच विस्फारतील. या हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी तब्बल 292,000 डॉल्रस म्हणजे जवळपास 2 कोटी 17 लाख 34 हजार 450 रुपये मोजावे लागतात. इथे रहायला मिळणं हे तर सामान्य माणसासाठी स्वप्नवतच ठरेल. पण जगभरातील अनेक अब्जाधीश ेथे राहून हा असमान्य अनुभव घेऊ शकतात.
हॉटेलमधून दिसतो समुद्राचा सुंदर नजारा
रिपोर्ट्सनुसार, ही पाणबुडी तुम्हाला खोल निळ्या समुद्रातून घेऊन जाते आणि येथे तुम्हाला समुद्राचे उत्तम नजारे पाहायला मिळतात. समुद्रातील लहान-मोठे मासे तुम्ही अगदी जवळून पाहू शकता. येथे तुम्हाला तुमच्या रूममधून समुद्रातील सौंदर्य पहायला मिळतं.
आणखी काय सुविधा ?
या हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. येथे तुम्हाला वैयक्तिक स्वयंपाकी देखील दिला जातो. तुम्हाला जे खायला आवडते ते तो तुमच्यासाठी शिजवून देतो. इथे महागड्या वाईनपासून ते पर्सनल हेलिकॉप्टरमधून फिरण्यापर्यंत सर्व काही सुविधा पुरवल्या जातात.