फेसबूकवर येते आणि असं फसवते, … तर तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा

| Updated on: Aug 30, 2023 | 2:52 PM

फेसबूकवर बऱ्याच रिक्वेस्ट येत असतात. त्यापैकी कुणाची रिक्वेस्ट अॅस्सेप्ट करायची ही अधिकार ज्याचा त्याचा आहे. पण, काही लोकं मोहात पडून कुणाचीही रिक्वेस्ट मान्य करतात आणि...

फेसबूकवर येते आणि असं फसवते, ... तर तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा
Follow us on

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२३ : ही कहाणी आहे अनिलची त्यांना फेसबूकवर अनिताची रिक्वेस्ट येते. विदेशी चेहरा पाहून अनिल आपल्या फेसबूक फ्रेंडच्या रिक्वेस्टमध्ये तिला सहभागी करतो. त्यानंतर अनिता मेसेंजरवर अनिलशी चॅट करणे सुरू करते. एक महिन्यापर्यंत त्यांचा चॅट सुरू असतो. अनिता स्वतःला मेडिकल प्रोफेशन, घटस्फोटिता, आयरलंडच्या निवासी असल्याचे सांगते. अनिलही स्वतःबद्दल सर्वकाही सांगून टाकतो. दोघेही रोज चॅट करतात. अनिता अनिलला भारतात येणार असल्याचं सांगते. ती त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. अनिल तिला घरी येण्याची विनंती करतो. अनिता मात्र त्याला हॉटेलमध्ये राहणार असल्याचं सांगते. अनिल अनिताच्या प्रेमात पडतो. एक आठवड्यानंतर फ्लाईटने येणार असल्याचं अनिता अनिलला सांगते. नंतर लंडनवरून दिल्लीला येणारी फ्लाईट सुटली असल्याचं अनिलला कळवते. त्यामुळे बूक केलेल्या हॉटेलमधील पैसे विनाकारण खर्च झाले. पुन्हा आठवड्याभरानं तिचा फोन येतो.

असा बनला शिकार

एका आठवड्यानंतर अनिता त्याला दिल्लीत आल्याचं सांगते. अनिल पुन्हा खूश होतो. फ्लाईट दिल्लीला आली होती. सोबत तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट होतं. पण, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबवलं. त्यावर कर द्यायचा आहे. भारतीय करन्सी खूप कमी आहे. गिफ्टच्या करापोटी ७२ हजार रुपये द्यायचे आहेत. तिच्या नंबरवर पैसे पाठवल्यास ती आयकर विभागाला एटीएममधून पैसे काढून देणार असल्याचं अनिता अनिलला सांगते.

हे सुद्धा वाचा

अनिल युपीआयच्या माध्यमातून अनिताला पैसे पाठवतो. त्यासाठी अनिल आपल्या मित्राकडून काही पैसे उधार घेतो. पैसे पाठवल्यानंतर अनिताचा अनिलच्या संपर्काबाहेर जाते. अनिताचा मोबाईल बंद असतो. अनिल यासंदर्भात ना कुटुंबीयांना सांगत ना पोलिसांना. मित्राकडे स्वतःची झालेली फसगत सांगतो. मग, मित्र अनिलची खिल्ली उडवतात.

अनिल कुठे चुकला?

परदेशी महिलेची रिक्वेस्ट अनिलला स्वीकारायला नको होती. स्वतःची संपूर्ण माहिती तिला देणे योग्य नव्हते. अनोळखी महिलेशी चॅट कमी केला असता तर कदाचित त्याची फसवणूक झाली नसती. परदेशी मुलगी तुम्हाला जी कधी भेटलीच नाही तिला तुम्ही पैसे कसे पाठवता. ७२ हजार रुपयांनी तो गलंडला. पण, असे कितीतरी अनिल यांची फसगत होत असते. अशा घटनांपासून सावध असणे गरजेचे आहे.

(टीप – या बातमीतील नावं बदललेली आहेत. )