एक काळ असा होता की आपले वय वर्षे 50 झाल्यावर केसांचा रंग बदलत असे. आपले केस अकाली पांढरे(Pre matured Grey hair) झालेले पाहायला मिळायचे. अनेकदा पिकलेले केस(White hair) म्हणजेच अनुभवाचे प्रतीक सुद्धा मानले जात असे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे उलटे घडत आहे आता तरुणांमध्येच नाहीतर लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला अकाली केस पांढरे होण्याची समस्या उद्भवताना पाहायला मिळत आहे म्हणूनच अनेक वैज्ञानिक या समस्यां(problem)मागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. केसांमध्ये पांढरेपणा येण्यामागे वैज्ञानिकांनी जे काही सांगितले आहे ते आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
सायन्स फोकसचा रिपोर्ट
सर्वात आधी आपण आपल्या केसांचा रंग पांढरा होतो याबद्दल जाणून घेऊ या. सायन्स फोकस यांच्या रिपोर्टनुसार आपले केस काळे होण्यामागील मेलॅनिनचा सर्वात जास्त वाटा असतो. हे एक पिगमेंट असते जे आपल्या केसांना काळा रंग प्रदान करत असते. जेव्हा आपल्या शरीरामधील मेलॅनिनची कमतरता निर्माण होऊ लागते अशा वेळी आपल्या केसांचा रंग बदलू लागतो आणि परिणामी केसांना पांढरा रंग येऊ लागतो. मनुष्यच नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला हा नियम लागू होताना दिसतो, आता समजून घेऊ या की अशी परिस्थिती नेमकी का उद्भवते त्यामागील काय आहे कारण..
मिलेनोसाइट्सचा प्रभाव
रिपोर्ट असे सांगतो, की आपल्या केसांच्या मुळाशी मिलेनोसाइट्स नावाच्या पेशी असतात ज्यामध्ये मिलेनियम तयार होते आणि यातूनच आपल्या केसांना मेलॅनिन हे तत्व मिळते. या कारणामुळेच आपले केस आपल्याला काळे दिसू लागतात. जसा व्यक्ती वृद्ध होत जातो त्याच बरोबर या पेशींमध्ये सुद्धा फरक जाणवू लागतो त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि मेलॅनिनचा प्रभाव कमी होऊन त्यांचा आपल्या केसांवर विपरीत परिणाम होताना दिसतो. अशावेळी आपल्या केसांचा रंग पांढरा होऊ लागतो परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ही समस्या तरूण मंडळी यांना तर उद्भवत आहे पण त्याचबरोबर अनेकदा लहान मुलांनासुद्धा अकाली केस पांढरे होण्याची समस्या त्रास देत आहे. या समस्या मागे अनेक वेगवेगळी कारणे सुद्धा असू शकतील.
पोषक तत्वांची कमतरता आणि…
रिपोर्टनुसार असे होण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे की शरीरामध्ये पोषक तत्वांची असलेली कमतरता, स्मोकिंग, एखादे आजारपण, ताण-तणाव किंवा एखादी जीवनामध्ये घडलेली आकस्मिक घटना यांमुळे मानसिक संतुलन बिघडणे इत्यादी सगळ्या समस्या सुद्धा केसांना पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरतात. अगदी कमी वयात केसांना पांढरेपण येण्यामागे नेमके काय कारण असते याबाबत येथील कोलंबिया युनिव्हर्सिटी इरविंग मेडिकल सेंटरमधील संशोधकांनी या समस्येवर संशोधन केलेले आहे. या संशोधनामध्ये अनेक अशा काही गोष्टी समोर आलेले आहेत ज्या आपल्याला थक्क करणाऱ्या आहेत.
ताण तणाव –
संशोधकांचे असे म्हणणे आहे, की केसांना पांढरेपणा येण्याचे सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्या जीवनात असलेला ताण तणाव. अभ्यासाअंतर्गत हे सिद्ध झाले आहे, की लोकांनी कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेण्यास कमी केले तेव्हा त्यांचे केस पांढरे होणे कमी होऊ लागले त्यानंतर त्यांचे केस पुन्हा काळे होण्यास सुरुवात झाली. संशोधनानुसार ताण तणावाचा आपल्या केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. त्याचबरोबर हा सगळा अभ्यास करत असताना यामागील पुरावेसुद्धा जमा करण्यात आले आहेत.