हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानियाची इराणची राजधानी तेहरान येथे हत्या झाल्याने पश्चिम आशियात युद्ध भडकणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे. हमासचा प्रमुख इस्माइलची इराणमध्येच हत्या घडवून मागे पडलेल्या इस्रायलने या मानसिक युद्धात आघाडी घेतली आहे. या हल्ल्याची सूत्रे इस्रायलची गुप्तहेर संघटना ‘मोसाद’कडे होते असा संशय इराणला आहे. हानिया हा मुळचा मवाळ गटाचे प्रतिनिधीत्व करणारा होता असे म्हटले जाते. आपल्या मागे ‘मोसाद’ आहे हे देखील त्याला माहिती होते. हल्ला होणार आहे म्हणूनच 2019 मध्ये हानियाने कतारमध्ये आश्रय घेतला होता. परदेशी भूमीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी मोसाद कधी घेत नाही. इराण आणि इस्रायल यांच्यात आता संघर्ष पेटणार असे म्हटले जात आहे. परंतू ‘मोसाद’ ही संघटना नेमकी काय आहे ? ती कसे काम करते ते पाहूयात… इस्रायल या छोट्याशा देशाची ‘मोसाद’ ही गुप्तहेर संघटना अमेरिकेच्या ‘सीआयए’ नंतर जगात सर्वात खतरनाक गुप्तहेर संघटना मानली जाते. मोसाद आपले ‘लक्ष्य’ कधीच चुकवत नाही. कारण मोसाद संघटनेचे एजंट आपले टार्गेट किंवा...