नवी दिल्ली : भारत सरकार सध्या उत्तराखंडात जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पावर काम करत आहे. भारतीय रेल्वेचा चार धाम प्रकल्प हा सरकारसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून सर्वेक्षण काम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे यात्रेकरूंना उत्तराखंडमध्ये असलेल्या चार धामांमध्ये सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक प्रवास करता येणार आहे. (What is the Char Dham project of Indian Railways, know how to go on a pilgrimage)
उत्तराखंडमध्ये येत्या पाच वर्षांत 153 किलोमीटर लांबीची रेल्वे रुळ पूर्ण करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. या रेल्वे मार्गाला गंगोत्री-यमुनोत्री रेल्वे मार्ग म्हणून संबोधले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकल्पासाठी 30,000 कोटींचा खर्च येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडे या प्रकल्पाचा अंतिम अहवाल असून यावर लवकरच काम सुरू होईल असा विश्वास आहे. एका जंक्शनमध्ये या मार्गावर 11 रेल्वे स्थानक प्रस्तावित केले आहेत. हा प्रकल्प राज्यात तीर्थक्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणणार असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकल्पातील एकूण अंतर 327 किमी असेल आणि ते ऋषिकेश येथून सुरू होईल.
केंद्र व राज्य सरकार या प्रकल्पावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकल्पांतर्गत उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री हे चार धाम एकमेकांशी जोडले जातील. असा विश्वास आहे की प्रकल्पाचा पहिला टप्पा 2024 पर्यंत पूर्ण होईल. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऋषिकेश ते कर्णप्रयागपर्यंत 125 किमी रेल्वे मार्ग टाकण्याची मुदत 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, चार धाम यात्रेसाठी सध्या प्राथमिक अभियांत्रिकी सर्वेक्षण सुरू आहे, ज्याचा उद्देश सुरक्षित, आरामदायक पद्धतीने आणि वेळेत धामपर्यंत पोहोचवणे आहे.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी सविस्तर आराखड्याची गरज आहे जेणेकरून पर्यटनाशिवाय इथल्या तीर्थक्षेत्राचीही आवश्यकता पूर्ण होईल. तसेच, यात्रेकरू सुरक्षित ठिकाणी आणि वेळेवर नियुक्त ठिकाणी पोहोचू शकतात. रेल्वेमंत्री गोयल यांनी चार धाम प्रकल्पांच्या संपर्क योजनांचा आढावा घेतला. कोरोना महामारीचे आव्हान असूनही, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे जाण्यासाठी चार धाम बीजी रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे अंतिम स्थान सर्वेक्षण (FLS) पूर्णत्वास येत आहे.
छोटा चारधाम किंवा चारधाम हे हिंदू धर्माच्या हिमालय पर्वतरांगांपैकी एक पवित्र मंदिर आहे. हे उत्तराखंड राज्यातील गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यात वसलेले आहे आणि या मार्गावर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री असे चार धाम आहेत. यापैकी बद्रीनाथ धाम ही भारताच्या चार धामपैकी सर्वात उत्तरी आहे. या चारही ठिकाणांची स्वतःची खासियत असली तरी चारधामच्या रूपाने ते एक युनिट म्हणून पाहिले जातात. (What is the Char Dham project of Indian Railways, know how to go on a pilgrimage)
चित्रपटांमध्ये गोळी पाठीवर लागो वा छातीवर, रक्त तोंडातूनच का येतं? वाचा या मागचं कारण…#ActionFilm | #Blood | #knowledge https://t.co/6Lhie0URda
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2021
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्याचे ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल, 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती
T20 World Cup : टी 20 वर्ल्डकप भारतात होणार की नाही, BCCI च्या बैठकीत काय ठरलं?