पॅन पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. बँकिंग व्यवहारासाठी पॅनकार्डची आवश्यकता आहे. निळ्या रंगातील हे सध्याचं पॅनकार्ड फिजिकल फॉर्मेटमध्ये आहे. प्लास्टिक कार्ड पर्समध्ये आरामात राहतं. आतापर्यंत आपण पॅनकार्डचा वापर करत आलो आहोत. या पॅनकार्डवर फोटो, नाव, पत्ता, सही आणि पॅन नंबर आहे. पण पॅनकार्डमध्ये आता एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सरकारने पॅनकार्डसाठी एक नवी योजना समोर आणली आहे. पॅन 2.0 अंतर्गत लोकांना आता क्युआर कोड असलेलं पॅनकार्ड मिळणार आहे. हे पॅनकार्ड इनकम टॅक्स फायलिंग, बँक अकाउंट आणि आर्थिक देवाणघेवाणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या पॅन 2.0 ची योजना राबवण्यासाठी जवळपास 1435 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मग या पॅन 2.0 मुळे जुनं कार्ड बाद होईल का? असे एक ना अनेक प्रश्न समोर येतात. आता पॅन 2.0 नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. हे पॅनकार्डचं अपग्रेडेड वर्जन आहे. यात काही अपडेटेड फीचर्स समाविष्ट आहेत. क्युआर कोडमुळे पटकन ओळख होते. अन्य सरकारी दस्ताऐवजांसोबत लिंक असते. कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी अॅडव्हान्स तंत्रज्ञानाची साथ घेतली आहे. हे पॅनकार्ड आणि ई पॅन पेक्षा अधिक सुरक्षित आहे.
तुमचं सध्याचं पॅनकार्डही वैध राहील. त्यामुळे जास्त काही चिंता करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे जुनं पॅनकार्ड आहे तर ते अपग्रेड करावं लागेल. पण सध्याच्या पॅनकार्डवरून तुम्ही आर्थिक देवाणघेवाण, टीडीएस/टिसीएस क्रेडीत, आयकर रिटर्न करू शकता. नवं क्युआर कोडवालं पॅनकार्ड बनवण्यासाठी तुम्हाला onlineservices.nsdl.com करावा लागेल. याशिवाय पॅनकार्ड केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या पत्त्यावर काही दिवसात पॅनकार्ड येतं. 15 ते 20 दिवसात पॅनकार्डची डिलिव्हरी होते.
दरम्यान, डिजिटल फॉर्मेटमध्ये तुम्ही ई पॅन डाऊनलोड करू शकता. पेपरलेस प्रक्रियेअंतर्गत QR कोड-आधारित हे ओळखपत्र आहे. ई पॅन लगेच मिळतं आणि पेपरलेस असतं. त्यामुळे पर्यावरणपूरक असतं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. यावर क्युआर कोड असल्याने हे अपग्रेटेड असेल.