नवी दिल्ली : आकाशातील (Sky) नव्हे हो, पण हे दिवे (Lamp) आता सगळीकडेच दिसतात आणि ते सारखे लुकझूक करतात. पण कशासाठी? आता तुम्ही म्हणाल उगा कोड्यात बोलू नका राव. कसल्या दिव्याची गोष्ट सांगातय तुम्ही? एलियनच्या (Alien) कथा तर आम्हाला बिलकूल सांगू नका. तर मंडळी हे दिवे आहेत..
तर मोबाईल टॉवर काही फक्त शोले स्टाईल आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे, असं नाही बरं. रात्रीच्यावेळी या टॉवरवर तुम्हाला एक गंमतीशीर गोष्ट सातत्याने दिसते, ती म्हणजे लाल दिवे. ते सारखे सुरु असतात. पण या टॉवरवर रात्रभर हे लाल दिवे का लावले जातात, हा प्रश्न कधीतरी तुम्हाला पडला आहे का?
आता पहिला प्रश्न हा येतो की, दिव्याचा रंग पांढरा, हिरवा, निळा अथवा इतर रंगाचा का नाही. तो फक्त लालच रंगाचा का आहे? लाल रंग तर धोक्याचे प्रतिक आहे. तसेच हा दिवा कितीही लांबून दिसू शकतो. लालरंगाची तरंगलांबी (Wavelength) म्हणजे दूरुन दिसण्याची त्याची क्षमता सर्वात जास्त आहे.
विशेष म्हणजे टॉवरची जेवढी उंची असेल तेवढे दिवे जास्त असतात. तर टॉवरची उंची घटली की, दिव्यांची संख्या ही कमी होते. wetraobstructionlight.com या संकेतस्थळानुसार, मोबाईल टॉवर 45 मीटरपर्यंत उंच असेल तर त्यावर एक लाल दिवा असतो. टॉवर 105 ते 210 मीटर दरम्यान असेल तर अशा टॉवरवर 45 मीटर, 105 मीटर, 150 मीटर आणि 210 मीटर वर एक दिवा लावण्यात येतो.
एवढंच काय, डायमीटरनवरही (Diameter) या लाल दिव्यांची संख्या अवलंबून असते. 6 मीटर डायमीटर असणाऱ्या टॉवरवर 4 लाल दिवे, 31 ते 61 मीटर डायमीटर टॉवरवर सर्व बाजूंनी 6 तर त्यावर जास्त डायमीटर असणाऱ्या टॉवरला 8 लाल दिवे लावले जातात.
या टॉवरवर हे लाल दिवे यासाठी लावण्यात येतात की, विमान, हेलिकॉप्टर यांना रात्रीच्या प्रवासात पायलटला टॉवरच्या उंचीचा योग्य अंदाज यावा आणि त्याला त्याच्यापासून योग्य अंतरावरुन उडता यावं.