नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतून (Indian Railway) लाखो प्रवाशी दररोज प्रवास करतात. प्रत्येक श्रेणीनुसार, प्रवासी प्रवास करतात. विविध बोगीतून प्रवाशी प्रवास करतात. श्रेणीनुसार, तिकीटाचे दर वेगवेगळे असतात. दररोज पॅसेंजर, मेल, मेल एक्सप्रेस, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट रेल्वे देशाच्या कान्याकोपऱ्यात धावतात. प्रत्येक रेल्वेला जनरल डब्बे असतात. जनरल डब्यात प्रवासासाठी जनरल तिकीट (General Train Ticket) साधं आणि स्वस्तातील तिकीट मिळते. पण हे तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळेत प्रवास करता येतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर दिवसभरात कधीही रेल्वेचा प्रवास करता येतो,असा अनेकांचा गैरसमज आहे. पण नियमानुसार, जनरल तिकीट खरेदीनंतर तुम्हाला पुढील तीन तासांत प्रवास करावा लागतो. याकाळात तुम्हाला इच्छित स्थळी पोहचणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचे तिकीट रद्द असल्याचे गृहीत धरुन तुम्हाला दंडम लागू शकतो.
भारतीय रेल्वेने यासाठी खास नियम तयार केले आहे. या नियमानुसार, जर 199 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर जनरल तिकीटावर तीन तासांच्या आता रेल्वेचा प्रवास करावा लागतो. तर 200 किलोमीटर वा त्यापेक्षा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तीन दिवस अगोदर तिकीट खरेदी करता येते.
पण 199 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असेल तर या नियमात बदल होतो. थोड्याशा अंतरासाठी कोणी प्रवासी तिकीट खरेदी करतो तर त्याला पहिली रेल्वेगाडी पकडणे फायद्याचे ठरते. ती हुकली तर पुढील तीन तासांत येणारी रेल्वे त्याला गाठावी लागेल. त्यानंतर नियमानुसार त्याला प्रवास करता येणार नाही.
रेल्वेने जनरल तिकीटासाठीची कालमर्यादा निश्चित केली आहे. 2016 मध्ये याविषयीचा नियम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे निर्धारीत वेळेनंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीच त्रास होणार नाही.
समजा, 199 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी एखाद्याने जनरल तिकीट खरेदी केले, तर त्याला पुढील तीन तासात नियमानुसार प्रवास करणे बंधनकारक आहे. जी पहिली रेल्वे येईल, त्यातून प्रवाशाला प्रवास करावा लागेल. तीन तास उलटल्यानंतर त्याने प्रवास केला, तर तो विना तिकीट प्रवास करत असल्याचे गृहीत धरण्यात येईल. त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
नियमानुसार निर्धारीत वेळेत प्रवास केला नाही तर तुमचे जनरल तिकीट रद्द होत नाही. तसेच वेळेनंतर प्रवास करत असल्याने प्रवासासाठी हे तिकीट ग्राह्य ही धरण्यात येत नाही. उलट विना तिकीट प्रवास केल्यानं तुम्हाला भूर्दंड बसू शकतो.
अनारक्षित तिकीटावर दिवसभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडा शिकवण्यासाठी रेल्वेने हे पाऊल टाकले आहे. यापूर्वी नियम नसल्याने जनरल तिकीटाचा प्रवासी दुरुपयोग करत असल्याचे आढळून आले होते. काहींनी तर याचा दुरुपयोग सुरु केला होता. अनेक जण प्रवासानंतर हे तिकीट दुसऱ्याला कमी भावात विक्री करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे रेल्वेला आर्थिक फटका बसत होता.