मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळा असो किंवा कोणताही सोहळा नेहमीच रेड कारपेट अंथरला जातो. कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्येही रेड कारपेटवर तारकांची मांदियाळी अवतरलेली असते. जेव्हा विशेष पाहूण्याचं स्वागत करण्याची वेळ येते तेव्हा नेहमी त्यांच्या दिमतीला रेड कारपेट अंथरलं जात असते. रेड कारपेट आणि महनीय व्यक्तींच्या स्वागताचा संबंध काय असा सवाल नेहमीच आपल्याला पडतो. एवढंच काय परदेशातूनही कोणी मंत्री किंवा पुढारी भारताच्या राजकीय भेटीवर येतो तेव्हा त्याचं स्वागत लाल गालिचा अंथरुणचे केले जाते. या कारपेटचा रंग नेहमी लालच असतो. पिवळा किंवा निळा नसतो ?
वास्तविक रेड कारपेटचा इतिहास युनानी नाटक अगामेमनॉन याच्याशी जोडलले आहे. यात या रंगाचा वापर नेहमी खास लोकांसाठी झालेला आहे. बीबीसीच्या एका लेखात लंडनच्या व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट म्युझियमच्या क्यूरेटर सॉनेट स्टॅनफिल यांनी म्हटलंय रेड कारपेटला नेहमी राजेमहाराजांशी जोडलेलं पाहायला मिळतं. रेड कारपेटशी संबंधी एक घटना आहे. साल 1821 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मनरो जेव्हा कॅलिफोर्नियाच्या जॉर्जटाऊन शहरात पोहचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रेड कारपेट अंथरले गेले होते.
1922 मध्ये रॉबिन हूड चित्रपटाच्या प्रिमियरसाठी इजिप्तिशियन थिएटर समोर एक लांबलचक रेड कारपेट अंथरले होते. त्यानंतर यावर तारे आणि तारकांची परेड झाली. ज्याला खूप पसंद केले गेले होते. 1961 मध्ये प्रथमच एकेडमी अवॉर्ड्स समारंभासाठी रेड कारपेट अंथरले गेले. या कारपेटला खास तयार केले गेले होते. हळूहळू पाहूण्यांच्या स्वागताला रेड कारपेट अंथरण्याची परंपरा तयार झाली. आज रेड कारपेट अंथरणे सर्वमान्य झाले आहे.