छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीतील नक्षलींचं पत्र टीव्ही 9 च्या हाती

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

बिजापूर: छत्तीसगडमधील बिजापूर इथं सुरक्षा रक्षकांनी मोठी मोहीम फते केली. जवानांनी तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव दलाने मिळून ही कारवाई केली. सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये अनेक तास ही चकमक सुरु होती. नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास भैरामगड ठाणे परिसरातील जंगलात […]

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीतील नक्षलींचं पत्र टीव्ही 9 च्या हाती
Follow us on

बिजापूर: छत्तीसगडमधील बिजापूर इथं सुरक्षा रक्षकांनी मोठी मोहीम फते केली. जवानांनी तब्बल 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव दलाने मिळून ही कारवाई केली. सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये अनेक तास ही चकमक सुरु होती. नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास भैरामगड ठाणे परिसरातील जंगलात स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव दलाने मोहीम करुन, 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून 11 हत्यारं जप्त केली आहेत. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या अबूझमाड जंगलात छत्तीसगडमधील एसटीएफ आणि डी आर जी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड अबूझमाड इथं सात तास ही शोधमोहीम चालली. त्यावेळी परत येताना पोलिसांना एक गुप्त महिती मिळाली की याच भागातील डोंगराखाली 40 ते 50 नक्षलवादी वास्तव्यास आहेत. याची महिती मिळताच एसटीएफ आणि डीआरजी पोलिसांनी हल्ला केला. यात आधी चार नक्षलवादी ठार झाले. त्यानंतर अडीच तास चकमक झाली यामध्ये एकूण दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.

छतीसगड पोलिसांनी अजूनही या जंगलात शोधमोहीम सुरुच ठेवली आहे. या ठिकाणावरुन नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. यात काही रायफल आणि बंदुका मिळून 11 शस्त्रांचा समावेश आहे. आज सकाळी सुरु झालेलं ऑपरेशन संध्याकाळपर्यंत सुरुच होतं. त्यामुळे आणखी काही नक्षलवादी पोलिसांच्या निशाणा बनण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीत नक्षलींकडून आदिवासींची हत्या
तर दुसरीकडे याच जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करतात. गेल्या पंधरा दिवसात गडचिरोली जिल्ह्यात 8 आदिवासी नागरिकांची हत्या नक्षलवद्यांनी केली आहे. या हत्या सत्रामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज भामरागड तालुक्यातील ताडगाव – वसफुडी जंगलात आनंदराव मडावी नावाच्या व्यक्तीची नक्षलवाद्यांनी खबरऱ्या म्हणून हत्या केली. या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी एक पत्र जारी केलं. हे पत्र टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलं. अनेकवेळा धमकी देऊनही आंनदराव मडावी पोलिसांना मदत करत होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली, असं या पत्रात म्हटलं आहे.