नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जनतेकडून रोष व्यक्त केला जात होता. या भ्याड हल्ल्यात आपल्या 40 जवानांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे संपूर्ण देशात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तर सरकारकडूनही पाकिस्तानची आतंरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यात आली होती. पुलवामा हल्ल्याला 12 दिवस झाले. या 12 दिवसात भारताने पाकिस्तानवर 12 वेगवेगळ्या प्रकारे प्रहार केले.
12 दिवसात पाकिस्तानवर करण्यात आलेले 12 प्रहार
- पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन दर्जा काढण्यात आला.
- श्रीनगर-मुझफ्फराबाद बस सेवा बंद
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना पाळणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली.
- पाकिस्तानातून आलेले सिमेंट भारतीय व्यापाऱ्यांनी सीमेवरुन परत पाठवले
- भारतीय कपडे व्यापऱ्यांनी पाकिस्तानात कपडे पाठवण्यास बंदी घातली
- भारतातून जाणारे फळ आणि टोमॅटोसुद्धा पाकिस्तानात पाठवणे बंद केले
- पाकिस्तानवरुन येणाऱ्या वस्तूंवरील सीमा शुल्कात 200 टक्क्यांनी वाढ
- पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नदीचे अतिरीक्त पाणी अडवण्याची घोषणा.
- BCCI ने पाकिस्तानला क्रिकेटमधून बाहेर काढण्यासाठी मागणी केली
- यूएनएससीमध्ये पाकिस्तानच्या विरोधात निषेध प्रस्ताव मंजूर
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैशच्या तळावर भारतीय वायूसेनेने मिराज 2000 द्वारे बॉम्ब हल्ला केला.
- भारतीय वायूसनेने बालाकोटमधील पाकिस्तानी सीमेच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे कॅम्प उडवण्यात आले.