मुंबई : राज्य सरकारकडून राज्यातील 20 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये IPS विश्वास नांगरे पाटील यांचेही नाव असून, नांगरे पाटील यांची नवीन नियुक्ती नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. गृह विभागाच्या उपसचिवांनी बदल्यांचे पत्रक काढले आहे.
IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या :
विश्वास नांगरे पाटील
आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र
आता – पोलीस आयुक्त नाशिक
सुनील रामानंद
आधी – पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
आता – पोलीस महानिरीक्षक राज्य सुरक्षा महामंडळ
पी. पी. मुत्याल
आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र
आता – विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड
रवींद्र सिंगल
आधी – पोलीस आयुक्तपदी नाशिक
आता – विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र
फत्तेसिंह पाटील
आधी – विशेष महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र
आता – गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
सुहास वारके
आधी – विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक
आता – विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र
दत्ता कराळे
आधी – पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक
आता – अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग, ठाणे
पी. आर. दिघावकर
आधी – अपर पोलीस आयुक्त, ठाणे पूर्व
आता – पोलीस उप महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंधक, मुंबई
जयंत नाईकनवरे
आधी – केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन
आता – पोलीस उपमहानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक
संजय दराडे
आधी – पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण
आता – पोलीस उप महानिरीक्षक विक्रीकर, सेवाकर
पी. व्ही. उगले
आधी – पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक, नाशिक
आता – पोलीस अधीक्षक, जळगाव
विनिता साहू
आधी – पोलीस अधीक्षक, भंडारा
आता – पोलीस अधीक्षक गोंदिया
हरीश बैजल
आधी – पोलीस अधीक्षक गोंदिया
आता – समादेशक राज्य राखीव पोलीस बळ गट क्रमांक 6 धुळे
अरविंद साळवे
आधी – पोलीस अधीक्षक वीज वितरण कंपनी
आता – पोलीस अधीक्षक, भंडारा
जयंत मीणा
आधी – अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण
आता – अपर पोलीस, बारामती, पुणे ग्रामीण
पंकज देशमुख
आधी – पोलीस अधीक्षक, सातारा
आता – पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
तेजस्वी सातपुते
आधी – पोलीस उप आयुक्त, पुणे शहर
आता – पोलीस अधीक्षक, सातारा
दत्ता शिंदे
आधी – पोलीस अधीक्षक, जळगाव
आता – पोलीस अधीक्षक वीज वितरण कंपनी
ईशू सिंधू
आधी – निवासी उप आयुक्त महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
आता – पोलीस अधीक्षक, अहमदनगर
रंजनकुमार शर्मा
आधी – पोलीस अधीक्षक, अहमदनगर
आता – पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर
सुनील कडासने
आधी – उपआयुक्त राज्य गुप्तवार्ता, नाशिक
आता – पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
संदीप पखाले
आधी – अपर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण
आता – अपर पोलीस अधीक्षक, बीड
सचिन पी. गोरे
आधी – समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6, धुळे
आता – अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव जळगांव
वेभव कलबुर्गे
आधी – अपर पोलीस अधीक्षक, बीड
आता – अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
हेमराज राजपूत
आधी – अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
आता – अपर पोलीस अधीक्षक खामगाव, बुलडाणा
प्रशांत बच्छाव
आधी – अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव, जळगांव
आता – प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे
श्याम घुगे
आधी – अपर पोलीस अधीक्षक खामगाव, बुलडाणा
आता – अपर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण