EXCLUSIVE | SSC Result mahresult.nic.in : दहावीच्या 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

| Updated on: Jun 08, 2019 | 12:51 PM

यंदाच्या दहावीच्या निकालात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला याबाबतची माहिती दिली. 

EXCLUSIVE | SSC Result mahresult.nic.in : दहावीच्या 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
Follow us on

SSC Result mahresult.nic.in पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 77.10 टक्के लागला असून निकालात तब्बल 12.31 टक्क्यांनी घट झाली आहे. दरम्यान यंदाच्या निकालात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी‘ला याबाबतची माहिती दिली.

राज्यात 16 लाख 39 हजार 862 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी जवळपास 12 लाख विद्यार्थी पास झाले. यातील तब्बल 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यात लातूरमध्ये सर्वाधिक 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर त्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये 3 विद्यार्थी आणि अमरावतीमधील एका विदयार्थ्याचा समावेश आहे. दरम्यान यात मुंबई आणि पुण्याचा एकही विद्यार्थी नसल्याचंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान दहावीच्या नऊ विभागीय मंडळात एकूण 16 लाख 39 हजार 862 विद्यार्थी नोंदणी केली होती. यातील 16 लाख 18 हजार 602 परीक्षेला बसले होती. त्यात 12 लाख 48 हजार 903 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाचा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आहे. यात विद्यार्थ्यांचा निकाल 72.18 टक्के असून , विद्यार्थिनींचा निकाल 82.82 टक्के लागला आहे. यंदा मुलींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 10.64 टक्क्यांनी जास्त आहे.

यंदा नऊ विभागीय मंडळातून सर्व शाखांत एकूण 59 हजार 603 पुनपरीक्षार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी 58 हजार 665 परीक्षा दिली. त्यातील 18 हजार 957 विद्यार्थी पास झाले होते. याची एकूण टक्केवारी 32.32 टक्के इतकी आहे.

तसेच जवळपास 2 लाख 90 हजार 032 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. तर 4 लाख 73 हजार 378 विद्यार्थ्यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

19 विषयांचा निकाल 100 टक्के

त्याशिवाय यंदा दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 83.05 टक्के लागला आहे. तसेच यंदा दहावीच्या 71 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात 19 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

1794 शाळांचा निकाल 100 टक्के

राज्यातील 22 हजार 246 शाळांतून 16 लाख 18 हजार 602 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 1794 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात पुणे विभागाच्या सर्वाधिक 349 शाळांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभागाच्या 331 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

किती शाळांचा निकाल 100 टक्के
पुणे – 349
नागपूर – 167
औरंगाबाद – 143
मुंबई – 331
कोल्हापूर – 303
अमरावती – 156
नाशिक – 179
लातूर – 70

दहावीचा विभागवार निकाल

पुणे – 82.47 टक्के
नागपूर – 67.27 टक्के
औरंगाबाद – 75.20 टक्के
मुंबई – 77.04 टक्के
कोल्हापूर – 86.57 टक्के
अमरावती – 71.97 टक्के
नाशिक – 77.57 टक्के
लातूर 72.87 टक्के
कोकण 88.38 टक्के

कोकण अव्वल, नागपूर कमी

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने 88.38 टक्के घेत बाजी मारली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 86.57 टक्के घेत कोल्हापूर विभाग असून, पुणे विभागात 82.47 टक्के निकाल लागला आहे. दरम्यान नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 67.27 टक्के लागला आहे.