चंदीगड : हरियाणातील एका सरकारी शाळेत 24 विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना हिसार जिल्ह्यातील एका गावात (Minor Sexual Abuse haryana school) घडली. याप्रकरणी शाळेतील लॅब असिस्टंट, फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर (पीटीआय) आणि कम्प्युटर शीक्षक यांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी पॉक्सो कायद्यातंर्गत यामधील दोघांना न्यायलयीन कोठडीत टाकले असून कम्प्युटर शीक्षक (Minor Sexual Abuse haryana school) फरार आहे.
बाल संरक्षण अधिकारी सुनीता यादव यांनी शाळेतील विद्यार्थीनींसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. त्यांच्या प्रयत्नामुळे आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले, असं पालकांनी सांगितले.
“तिन्ही सरकारी शिक्षक ऑगस्ट 2019 पासून विद्यार्थीनींवर लैंगिक शोषण करत होते. ज्यामध्ये आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थीनींचा समावेश होता. विद्यार्थीनींच्या पालकांनी याघटनेची तक्रार शाळेचे मुख्याधापक आणि गावाचे प्रमुख यांनाही केली होती. पण त्यांनी यावर काही कारवाई केली नाही. पण जेव्हा बाल संरक्षण अधिकारी शाळेत आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला”, असं बाल संरक्षण अधिकारी सुनीता यादव यांनी सांगितले.
“मी 16 डिसेंबर रोजी शाळेत पोहोचली तेव्हा 24 मुलींनी लेखी तक्रार केली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होते की, शाळेतील पीटीआय, लॅब असिस्टंट आणि कम्प्युटर शिक्षकांनी लैंगिक शोषण केले. तसेच त्यांनी पीडित विद्यार्थीनींना धमकावले होते. जर या घटनेची माहिती कुणाला दिली तर आम्ही तुम्हाला परीक्षेत नापास करु”, असंही सुनीता यादव यांनी सांगितले.
तिन्ही शिक्षक विद्यार्थीनींना शाळेत लवकर बोलावून उशिरा घरी सोडायचे. हिसार पोलिसांनी तिघांविरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे. तर कम्प्युटर शिक्षकाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
दरम्यान, “शाळेच्या परिसरात फक्त 25 ट्क्के भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. ज्यामध्ये कम्प्युटर लॅब, मॅथ लॅब, सायन्स लॅब आणि वॉशरुमचा समावेश नाही. त्यामुळे जिथे कॅमेरे नाही अशाच ठिकाणी विद्यार्थीनींवर लैंगिक शोषण केले जात होते”, असं बाल संरक्षण अधिकार यांनी सांगितले.