26/11 Mumbai Attack PHOTO : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शहीद पोलिसांना श्रद्धांजली
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (CM Uddhav Thackeray pays tribute 26/11 Mumbai Attack Photo)
-
-
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात मुंबईतील ताज हॉटेलसह सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला.
-
-
या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 160 जणांचा मृत्यू झाला होता. यातील सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे झाले होते.
-
-
या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण आलं होतं. या पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते.
-
-
नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.
-
-
मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पुष्पांजली अर्पण करून उद्धव ठाकरेंनी या वीरमरण आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.
-
-
या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलिसांमार्फत पोलीस आयुक्तालयात मानवंदना देण्यात आली.
-
-
याआधी पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह इथे ही श्रद्धांजली दिली जायची. मात्र यंदा कोस्टल रोड प्रोजेक्टच्या कामामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
-
पाहा आणखी काही फोटो
-
-
पाहा आणखी काही फोटो
-
-
पाहा आणखी काही फोटो
-
-
-
पाहा आणखी काही फोटो