नागपूर : गेल्या काहीदिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (Corona Patient recover Nagpur) आहे. अशामध्येच आता नागपूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. काल (14 मे) एकाच दिवशी एकूण 28 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या 28 जणांना काल डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय नागपुरात काल तीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Patient recover Nagpur) आले आहेत.
नागपूरमध्ये आतापर्यंत 318 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी 140 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नागपुरात कोरोनामुळे एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मध्य भारतातील सर्वात मोठं कोरोनाचे केंद्र बिंदू नागपुरात
नागपुरातील सतरंजीपुरा परिसर मध्य भारतातील ‘कोरोना’ साखळीचं सर्वात मोठं केंद्रबिंदू ठरत आहे. एकट्या सतरंजीपुरा परिसरात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारं सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.
68 वर्षीय कोरोनाबाधीत मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर इथली कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली.
दरम्यान, राज्यातदिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 27 हजार 524 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 6 हजार 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 27,524 वर