पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. गेले दीड महिने राज्यात लॉकडाऊन (Business start in pune district) आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये आता लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर पुण्यातील औद्योगिक क्षेत्र काहीसं पूर्वपदावर येऊ लागलं आहे. जिल्ह्यात 3579 लघू आणि मोठे उद्योग सुरु झाले आहेत. दोन लाख 69 हजार 572 कामगार कामावर रुजू झाले (Business start in pune district) आहेत.
दीड महिन्यानंतर एमआयडीसीतील आणि बाहेरील उद्योगधंदे सुरू झालेत. पुणे जिल्ह्यातील आणि पुणे विभागातील अनेक उद्योग सुरू झालेत. जिल्ह्यातील सतरा एमआयडीसीमध्ये 890 युनिट सुरू झालेत. तर एमआयडीसी बाहेर 2594 उद्योग सुरू आहेत. इथं तब्बल दोन लाख 69 हजार 572 कामगार काम करत आहेत.
पुणे विभागात एकूण 7894 उद्योग सुरू झाले आहेत. तर 3 लाख 58 हजार 423 कामगार कामावर रुजू झाले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 3579 लघू आणि मोठे उद्योग सुरु झाले आहेत. पुणे जिल्ह्याबरोबर सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर येथेही उद्योग सुरु झाले आहेत.
लॉकडाऊनमध्ये गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व एमायडीसी आणि उद्योगधंदे ठप्प होते. मात्र सरकारच्या तीन मेच्या आदेशानंतर उद्योगधंदे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच कंटेन्मेंट झोनच्या बाहेर उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होते. तसेच या पार्श्वभूमीवर काही अटी व नियम दिले होते.
पुणे जिल्ह्यात रांजणगाव, चाकण, तळेगाव, हिंजवडी, बारामती, कुरकुंभ,जेजुरी, भिगवण, खेड, तळवडे, खराडी या एमआयडीसीमध्ये बहुतेक कारखाने सुरू झाले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वाहनानं प्रवासास बंदी आहे. या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या डेडिकेटेड बसमधून परवानगी दिली आहे.
संबंधित बातम्या :
पुणे जिल्ह्यात 516 उद्योगांना परवानगी,19 कंपन्यांमध्ये उत्पादनही सुरु
पुणे जिल्ह्यातील काही भागात ‘या’ अटींसह उद्योगधंद्यांना परवानगी