कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे देशात आणखी चार रुग्ण, आतापर्यंत 29 संक्रमितांची नोंद

| Updated on: Jan 01, 2021 | 8:31 PM

भारतात आज कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेले चार नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे देशात आणखी चार रुग्ण, आतापर्यंत 29 संक्रमितांची नोंद
Follow us on

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या रुपातील कोरोना विषाणूमुळे (Corona New Strain) जगभरातील देशांची झोप पुन्हा उडाली आहे. नवे रंगरुप घेऊन आलेला कोरोनाचा हा नवा अवतार पूर्वीच्या विषाणूपेक्षा भयंकर आहे. भारतात आज कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेले चार नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ब्रिटनहून भारतात आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे. (4 new cases of UK covid strain traced in india overall 29 infected)

ब्रिटनहून परतणाऱ्या 29 लोकांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची बाधा

आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटनहून भारतात आलेल्या 29 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. आज 3 नव्या रुग्णांची तपासणी बंगळुरुमधील NIMHANS मध्ये तर एका रुग्णाची तपासणी हैदराबादमधील CCMB लॅबद्वारे करण्यात आली आहे. सध्या या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

अंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट

नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी खबरदारी घेणे सुरु केलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तेथील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनहून परतेलेल्या 1,423 पैकी 1,406 नागरिकांना ट्रेस करण्यात आलं आहे.

यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण

कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे (B.1.1.7.) यूकेमध्ये चिंतेचं वातावरण आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यूकेमध्ये सोमवारी तब्बल 41 हजार 385 नवे कोरोनाग्रस्त आढळले. यूकेमध्ये पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना रुग्णसंख्येने 40 हजारांचा टप्पा पार केला.

कोरोनाचा नवा विषाणू का झालाय आऊट ऑफ कंट्रोल?

ब्रिटनसह युरोपच्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नव्या प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे.

कोरोना व्हायरसमधील हे म्युटेशन सामान्य आहे का?

लीसेस्टर विद्यापीठातील वैद्यकीय संसर्गतज्ज्ञ डॉ. ज्युलियन टँग यांच्या माहितीनुसार, विषाणूत अशाप्रकारचा बदल (म्युटेशन) सामान्य बाब आहे. इन्फ्लूएंझाप्रमाणे विविध विषाणू एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतात. यामधून हायब्रिड व्हायरसची निर्मिती होऊ शकते. तर लीव्हरपूल विद्यापीठातील प्राध्यापक ज्युलियन हिसकॉक्स यांच्या मतानुसार कोरोनाच्या विषाणूमध्ये सतत बदल घडत असतात. त्यामुळे SARS-CoV-2 चे नवे प्रकार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानव आणि प्राण्यांच्या शरीरात असणाऱ्या विषाणुंबाबत ही परिस्थिती नेहमी पाहायला मिळते.

हे ही वाचा

कोरोनाचा नवा अवतार देशातील 36 कोटी लहान मुलांसाठी धोकादायक, वाचा कसा?

कोरोनावरील लस ब्रिटन आणि द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी : आरोग्य मंत्रालय

(4 new cases of UK covid strain traced in india overall 29 infected)