Maruti Suzuki च्या 6 सीटर गाडीची लाँचिंग तारीख ठरली

| Updated on: Jul 23, 2019 | 5:03 PM

Maruti Suzuki XL6 या गाडीत मोठ्या आकाराचे ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि बंपर देण्यात आले आहेत. यामुळे ही गाडी अर्टिगापेक्षा वेगळी दिसते.

Maruti Suzuki च्या 6 सीटर गाडीची लाँचिंग तारीख ठरली
Follow us on

मुंबई : मारुती सुझुकी लवकरच 6 सीटची प्रीमियम एमपीवी (मल्टी परपज व्हीकल) XL6 गाडी लाँच करणार आहे. येत्या 21 ऑगस्टला मारुती सुझुकीची XL6 गाडी लाँच करण्यात येणार आहे. मात्र Maruti Suzuki XL6 ही नवी गाडी लाँच होण्यापूर्वी या गाडीचे काही फोटो लीक झाले आहेत.

Maruti Suzuki XL6 या गाडीवर सिल्वर स्किड प्लेट आणि ड्युल टोन बंपर आहे. त्यासोबतच या गाडीच्या चाकाजवळ प्लास्टिक क्लैडिंग देण्यात आलं आहे.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, Maruti Suzuki XL6 या गाडीच्या मागे नेक्साचा बॅच देण्यात आला आहे. या गाडीचे दरवाजे आणि मागील गेट हा स्टँडर्ड अर्टिगाप्रमाणे आहे. तसेच गाडीची चाकं आणि लाइट्स हे देखील अर्टिगाप्रमाणे आहेत. तसेच ही गाडी 7 सीटच्या एमपीवी अर्टिगाप्रमाणे दिसते. पण लूक किंवा केबिननुसार ही गाडी अर्टिगापेक्षा वेगळी असल्याचा सांगितलं जात आहे.

फोटो सौजन्य : Gaadiwaadi.com

लीक झालेल्या फोटोत या नवीन गाडीचा बाजूचा आणि समोरील लूक दिसत आहे. Maruti Suzuki XL6 या गाडीत मोठ्या आकाराचे ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि बंपर देण्यात आले आहेत. यामुळे ही गाडी अर्टिगापेक्षा वेगळी दिसते. पण जर समोरच्या बाजूने ही गाडी तुम्हाला अर्टिगा प्रमाणेच भासते.

या नव्या गाडीचे इंटीरिअर काळ्या रंगाचे असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या गाडीत स्मार्ट प्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टमही देण्यात आला आहे.

फोटो सौजन्य : Gaadiwaadi.com

मारुतीच्या नव्या गाडीत 1.5  पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे इंजिन BS-6 या एमिशन नॉर्म्सने अनुरुप आहे. या गाडीची किंमत 8 लाखापासून 11 लाखापर्यंत असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या : 

हफ्त्यावर घेतलेलं वाहन विकायचं असेल तर काय कराल?

बजाजची नवी बाईक लाँच, किंमत फक्त…