मुंबई : राज्यात आतापर्यंत पोलीस दलातील 85 पोलिसांचे कोरोनाने निधन झाले (Police Death due to Corona) आहे. यामध्ये 6 अधिकारी आणि 79 पोलिसांचा समावेश आहे. तर कोरोना संचारबंदीच्या काळात आतापर्यंत पोलिसांवर 314 ठिकाणी हल्ले झाले आहेत. यामध्ये 86 पोलीस जखमी झाले (Police Death due to Corona) आहेत.
राज्यातील एकूण 1344 पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणं आहेत. यामध्ये 164 अधिकारी आणि 1180 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यात संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पोलिसांवर 314 ठिकाणी हल्ले झाले आहेत. तर यामध्ये 86 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी यामधील 879 हल्लेखोरांना अटक केली आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
राज्यभरात कोविड संदर्भात आतापर्यंत 1 लाख 86 हजार 605 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 40 हजार 780 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांवरही पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 92 हजार 145 हजार वाहनं जप्त केली आहेत. अवैध वाहतुकीबाबत 1344 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर यामधून 15 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, राज्यभरात डॉक्टर आणि वैद्यकीय सेवकांवरही आतापर्यंत 54 हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 17 July 2020 https://t.co/X9ccQRoi0A
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 17, 2020
संबंधित बातम्या :
एकाच दिवसात 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना लागण
राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पोलिसांच्या दक्षतेसाठी गृह विभागाकडून नियमावली जारी