चंद्रपूर: अवैध दारु भरलेल्या वाहनाने उडवल्याने पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. छत्रपती किडे असं या दुर्दैवी पीएसआयचं नाव आहे.
छत्रपती किडे हे नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पहाटे चारच्या सुमारास मौशी चोरगावजवळ ते पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना उडवले. या धडकेत छत्रपती किडे हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, ज्या वाहनाने धडक दिली, त्या वाहनातून अवैध दारु वाहतूक केली जात होती असं आता समोर आलं आहे. या वाहनात अवैध दारु असल्याची माहिती असल्यानं, पोलीस या मार्गावर गस्त घालत होते.
त्याचवेळी भरधाव आलेल्या या वाहनाने छत्रपती किडे यांना धडक दिली.