उदयपुर-अहमदाबाद नॅशनल हायवे वर मुलींचे कपडे घालून वाहन चालकांना लिफ्टच्या बहाण्याने थांबवून लुटणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश झाला आहे. या गॅंगने लुटमारीची आणखी एक योजना आखली होती. त्याची तयारी करीत असताना पोलिसांनी त्यांना सापला रचून अटक केली आहे. या गॅंगने चौकशीत हायवेवर अनेक लुटमारीच्या गुन्ह्यांची कबूली दिली आहे.या गॅंगच्या सहा दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.या सर्वांना काल शुक्रवारी प्लान करीत असतानाच उदयपूर पोलिसांनी अचानक कारवाई करीत अटक केली आहे.
उदयपुर-अहमदाबाद नॅशनल हायवेवर मुलीचे पोशाख घालवू रात्री अपरात्रीचा प्रवास करणाऱ्या चालकांना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने थांबवायचे आणि त्यानंतर त्यांना लुटुन ही गॅंग पसार व्हायची.पोलिसांनी काल त्यांना सापळा रचून अटक केली आहे. या गॅंगच्या सहा जणांकडून बाईक, महिलांचे कपडे , चार चाकू, दोरखंड,टॉर्च, हंटर, लाठी, मिरची पावडर आणि सहा मोबाईल जप्त केले आहेत.पोलिस अधिकारी भवानी सिंह राजावत यांनी सांगितले की हायवे वाहन चालकांना लुटल्याच्या अनेक घटना गेल्याकाही महिन्यात घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना पाळत सुरु ठेवली होती.
काही जण खरपीणा येथे लुटण्याची योजना आखत होते. जेव्हा पोलिसांची टीम तेथे दाखली झाली. त्यावेळेला झाडीत या गॅंगची कोणाला तरी लुटण्याची योजना सुरु असतानाच त्यांना अटक झाल्याचे राजावत यांनी सांगितले. या प्रकरणात नारायण खराड़ी (19), मनीष उर्फ मनीषा गमेती (19), मनीष गमेती (18), शांतिलाल खराड़ी (18), गोविंद कलासुआ (21) आणि नारायण पटेला (35) यांना अटक करण्यात आली आहे.
या गॅंगचा म्होरक्या गोविंद कलासुआ आणि मनीष आहे. गोविंद हा पळण्याच्या तयारीत होता. त्याला पकडतान तो पडल्याने त्याच्या पायाचे हाड मोडले आहे. मनीष हा रात्रीचा मुलींच कपडे घालून हायवेवर ट्रक चालकांकडे लिफ्ट मागायचा. वाहन थांबल्यावर मनीष ड्रायव्हरला बोलण्यात गुंतवत ड्रायव्हरला रस्त्याच्या कडेला झाडीत घेऊन जायचा.त्यानंतर पैसे आणि इतर वस्तू चोरुन हे टोळके पसार व्हायचे