पुणे – शहरात विवाहितेने हुंड्यासाठी (dowry)होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत विवाहित व्यवसायाने परिचारिका (nurse)असून, एका नामांकित रुग्णालयात कार्यरत होती. सुजाता राजकुमार बागळे (वय 28 , रा. भेकराईनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे.
नेमकं काय झालं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुजाता हिचे लग्न झाल्यापासून पती राजकुमार हा त्यांना माहेरहून हुंडा आणावा म्हणून तगादा लावत होते. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते . यामध्ये नणंद रविता व वर्षा या देखील अपमानाची वागणूक देत असत. या सततच्या त्रासाला कंटाळून सुजाता हिने भेकराईनगर फुरसुंगी येथील राहत्या घरी साडेबाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुजाताचे वडील अंकुश शंकर वर्षे वय 55, रा. मंगरूळ, ता. कळंब) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती राजकुमार बाळगे (वय 28), नणंद रविता केशव वर्पे (वय35 ), वर्षा संतोष घुमरे (वय 31 ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. ही 26 फेब्रुवारी 2019ते 12र्च 2022 दरम्यान भेकराईनगर फुरसुंगी परिसरात घडली आहे. या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.
पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया भाजपला झाला, राष्ट्रवादीचं गोपीचंद पडळकरांना सडेतोड प्रत्युत्तर
Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर लाईनवर मेगाब्लॉक जाहीर
Video : ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद