पुणे : राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे बाण एकमेकांवर सोडले जात असतांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी करण्यात आलीय. ही मागणी स्वतः सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीच केल्याने राजकीय वातावरण तापणार हे निश्चित आहे. तसे अजित पवारांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाहीये. मात्र, भविष्यात राष्ट्रवादीच्या गोटातून कुणाला मुख्यमंत्री करायचे असा मुद्दा समोर आला तर सुप्रिया सुळे यांचे नाव देखील आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. मात्र, अजित पवारांना मानणारा दूसरा गट हा सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी अजित पवारांचे नावाची मागणी करेल. शरद पवार (Sharad Pawar) मात्र हे सुप्रिया सुळे यांना पुढे करू शकतात.
त्या मागची कारणे वेगवेगळी असली तरी पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांच्याची घोषणा करू शकतील त्याचा राजकीय फायदा देखील होऊ शकतो.
ह्या जर तरच्या घटना असल्या तरी त्याची राजकारणात मोठी चर्चा होत आहे. टीव्ही 9 शी बोलत असतांना सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले आहे.
राज्यात फॉक्सकॉन प्रकल्प जवळपास मंजूर झालेला असतांना तो गुजरात गेलाच कसा या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहेत.
त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलत असतांना या राज्याचं हे दुर्दैव आहे असे मत व्यक्त करत एवढा मोठा प्रकल्प आज महाराष्ट्राबाहेर जातोय अशी खंत व्यक्त केलीय.
याशिवाय महाविकास आघाडीवर खापर फोडणारे मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते असे म्हणत शिंदे गटावर देखील सुळे यांनी टीका केली आहे.
अशी टीका करत असतांना मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, तुम्ही राजीनामा द्या आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पद द्या तुम्हाला यापेक्षाही मोठं पद देऊ अशी टीका सुळे यांनी केली.
मोदींच्या मोठा प्रकल्प देण्याच्या आश्वासनावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया देत राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक फिरणारे आणि दुसरे मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवणारे असेही सुळे म्हणाल्या आहेत.