मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये सुरू असलेला नेपोटिझम (Nepotism) अर्थात घराणेशाही वाद समोर आला. या वादात अनेक बड्या कलाकारांवर नेपोटिझमचे आरोप लावले गेले. यातील एक मोठे नाव म्हणजे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan). चित्रपट क्षेत्रात नेहमीच अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची तुलना केली गेली. नेपोटिझमप्रकरणातही अभिषेकवर वडिलांची कृपा म्हणत टीका करण्यात आली होती. यावर अभिषेक बच्चनने आता सणसणीत उत्तर देत, सगळ्यांची बोलती बंद केली आहे (Abhishek Bachchan opens up on nepotism).
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अभिषेकला नेपोटिझमबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, ‘माझ्या वडिलांनी कधीच माझी शिफारस केली नाही. त्यांनी माझ्यासाठी कुठलाच चित्रपट तयार केला नाही. याउलट मीच त्यांच्यासाठी ‘पा’ नावाचा चित्रपट तयार केला होता’, असे म्हटले.
‘रीफ्युजी’ या 2000मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिषेक बच्चनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये त्याचे अनेक चित्रपट अयशस्वी ठरले. मात्र, या क्षेत्रात टिकून राहिला. याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, ‘लोकांनी आपल्याला स्वीकारलं, तरच आपण या क्षेत्रात खूप पुढे जाऊ शकतो. लोकांनीच नाकारले तर आपले करिअर पुढे जाणार तरी कसे?’
या सगळ्यात मी केवळ माझ्या स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला. वडिलांनी माझ्यासाठी कधी कोणाकडे शिफारसी केल्या नाहीत. त्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली’, असे अभिषेक बच्चन म्हणाला. (Abhishek Bachchan opens up on nepotism)
‘पहिल्या चित्रपटात प्रेकक्षकांना तुमच्यात काही दिसले नाही, किंवा तो चित्रपट तिकीट खिडकीवर चालला नाही, तर पुढे तुम्हाला काम मिळणे कठीण असते. हा या चित्रपट व्यवसायाचा कटू नियम आहे. मला माहित आहे की, माझे चित्रपट चालत नाहीत. अनेकदा मला चित्रपटांमधून वगळण्यात आले आहे. माझ्या ऐवजी दुसऱ्यांना घेऊन ते चित्रपट तयार करण्यात आले आहेत. काही चित्रपटांतून तर, बजेट नसल्याचे कारण देत काढण्यात आले’, असे म्हणत अभिषेकने त्याच्यावर नेपोटिझमचा आरोप लावणाऱ्यांची बोलती बंद केली. (Abhishek Bachchan opens up on nepotism)
माझ्या वडिलांनी म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांनी कधीच माझ्यासाठी कुठलाही चित्रपट तयार केला नाही. या उलट मीच त्यांच्यासाठी ‘पा’ नावाचा चित्रपट तयार केला होता. चित्रपट हा एक व्यवसाय आहे आणि लोकांनी तो समजला पाहिजे’, असे अभिषेक म्हणाला.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रीद’ या वेब सीरीजमध्ये अभिषेक बच्चन झळकला होता. यातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘लुडो’ या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
Ludo ka asli maza saath mein khelne mein hai. Aur mera teammate thoda hatke hai. Maza aayega! #Ludo premieres 12 November, only on Netflix.@NetflixIndia #AdityaRoyKapur @RajkummarRao @TripathiiPankaj @sanyamalhotra07 @fattysanashaikh @Pearle_Maaney #RohitSaraf #InayatVerma pic.twitter.com/82pxByM8bR
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) November 3, 2020
(Abhishek Bachchan opens up on nepotism)