Marathi News Latest news Acharya chanakya how earn money and save money financial constraints in life know more about this
Chanakya Niti : हातामध्ये आलेला पैसा टिकतच नाहीये? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या 4 गोष्टींचे नक्की पालन करा
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे.
1 / 5
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले होते की, लोकांना असे वाटते की जीवनाचे ध्येय फक्त पैसा (Money) मिळवणे आहे. श्रीमंत होण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याशी संबंधित गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
2 / 5
पैशाचा चुकीची वापर करु नका - आपल्याकडे असलेल्या पैशाचा कधीच चुकीचा वापर करु नका. पैशामुळे तुमच्या वागण्यात बदल होईल असे कधीही वागू नका. ज्या ठिकाणी पैशाचा आदर केला जातो तेथे माता लक्ष्मीचा वास असतो.
3 / 5
वाईट मार्गाने पैसे कमवू नका - चाणक्य नीतीनुसार, फसवणूक किंवा चुकीच्या कामातून कमावलेली संपत्ती कधीही तुमच्यासोबत राहत नाही. अशा संपत्तीमुळे तुमचे वैयक्तीक नुकसान देखील होते. त्यामुळे पैसे नेहमी चांगल्या मार्गानी येतील याची काळजी घ्यावी.
4 / 5
पैसा जतन करुन ठेवा - चाणक्या नीतीनुसार आपल्याकडे असणारा पैसा आपण जतन करून ठेवला पाहिजे. जेव्हा आपण पैसा जपतो किंवा योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूतक करतो तेव्हा पैसा वाढतो. त्यामुळे आपण पैशाची बचत करायला हवी.
5 / 5
वाईट लोकांची संगत सोडा - चाणक्य नीतीनुसार जर तुम्ही वाईट लोकांची संगत सोडली तर तुमचे पैसे वाचण्यास मदत होईल. वाईट मार्गाला लागलेल्या व्यक्ती तुम्हाला देखील वाईट मार्गाला लावतात त्यामुळे तुमचे पैसे वाया जातात.