मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार हा नेहमी त्याच्या सिनेमांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यातील क्षमतेबाबत सांगत असतो. त्याशिवाय तो महिलांसक्षमीकरण करणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही भाग घेत असतो. अक्षय कुमार त्याची मुलगी नितारालाही एक सक्षम आणि निर्भय मुलगी होण्याचे धडे देतो.
भारत सध्या ‘चंद्रयान-2’ ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. या ‘चंद्रयान-2’ प्रोजेक्ट आणि मिशनला दोन महिला शास्त्रज्ञ डायरेक्ट करत आहेत. या दोन्ही शास्त्रज्ञांना अक्षय कुमारने त्यांचा हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
India’s second space mission to the moon, #Chandrayaan2 is led by two women scientists of @isro , a first in India’s history! Sending my best to the rocket women and #ISRO team, more power to you! pic.twitter.com/AX6e8335YK
— Akshay Kumar (@akshaykumar) July 14, 2019
‘भारताचं चंद्रावरील दूसरं स्पेस मिशन, ‘चंद्रयान-2’ इंडियन स्पेस रिसर्च आर्गेनाईजेशन (ISRO) चं दोन महिला शास्त्रज्ञ नेतृत्व करत आहेत. हे भारतीय इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. मी या रॉकेट वुमेनना आणि इस्रोच्या टीमला माझं खूप प्रेम, तुम्हाला आणखी शक्ती मिळो’, असं ट्वीट अक्षयने केलं.
‘चंद्रयान-2’ हे भारताचं सर्वात महत्त्वाकांक्षी दूसरं चंद्र मिशन आहे. हा चंद्रयान श्रीहरिकोटा येथीलव सतीश धवन स्पेस सेंटरवरुन 15 जुलैला रात्री 2 वाजून 51 मिनिटांनी लाँच केला जाणार आहे.
अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘मिशन मंगल’ या सिनेमाच्या प्रदर्शाची तयारी करत आहे. हा सिनेमा भारताच्या पहिल्या मंगळयान प्रोजेक्टच्या कहाणीवर आधारीत आहे. मंगळयानला नोव्हेंबर 2013 मध्ये लाँच करण्यात आलं होतं.