मुंबई : बॉलिवूडमध्ये सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले (Actor Rishi Kapoor Hit Movies) आहे. गुरुवारी सकाळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी दिली. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास (Actor Rishi Kapoor Hit Movies) घेतला.
ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. ऋषी कपूर यांनी आतापर्यंत जवळपास 120 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत काम केलं आहे. या दरम्यान त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.
ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट
दरम्यान, ऋषी कपूर हे एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. त्यांनी चित्रपटांच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. अभिनेत्री जुही चावलासोबत ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमाचं चित्रीकरण त्यांनी सुरु केलं होतं. मात्र त्यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपुरीच राहणार आहे.
संबंधित बातम्या :