अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा नुकताच दुसरा प्री-वेडिंग सेलिब्रेशन झाले. इटलीमध्ये एका क्रूझवर हे सेलिब्रेशन झाले. अनेक सेलेब्रेटी या सेलिब्रेशन सोहळ्यात सामील झाले होते. आलिया भट्ट पती रणबीर कपूर याच्यासोबत या सोहळ्यात सहभागी झाली होती. अंबानी आणि कपूर कुटुंबामध्ये अनेक वर्षांपासून एक खास नाते आहे. त्यामुळेच रणबीर आणि आलिया अंबानी यांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात सामील झालेले पहायला मिळते. हा सेलिब्रेशन सोहळा संपला असला तरी त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे सेलिब्रेटी त्याचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असतात. आताही आलिया भट्ट हिने काही फोटो शेअर केले आहेत.
अलीकडेच रिया कपूर हिने तिच्या इंस्टाग्रामवर राधिका मर्चंटच्या लूकचे अनेक फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता आलिया हिनेही इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अभिनेत्री आलिया पावडर ब्लू कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये आलियाने रणबीर कपूर याचा हात पकडलेला दिसत आहे. यादरम्यान रणबीर बो-टाय लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये रणबीर आणि आलिया एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. रणबीरच्या चेहऱ्यावर मास्क आहे. सूर्यास्ताच्या वेळेचा हा फोटो आहे. ज्याचा त्यांनी कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे. फोटो पोस्ट करताना अभिनेत्रीने लिहिले- सनसेट क्लब. आलिया भट्ट ही लवकरच जिगरा चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय संजल लीला भन्साळी यांच्या लव्ह ॲड वॉर या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल दिसणार आहेत.
दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच कपूर कुटुंब त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी आले होते. यावेळी राहा हिने तिच्या पालकांसोबत बांधकाम साईटला भेट दिली. जिथे ते तिघेही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. राहा कपूर ही बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय स्टार किड आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला की तो व्हायरल होतो. त्यामुळे आई आलिया भट्ट हिच्या मांडीवर बसून तिचे नवीन घरी पहायला आलेल्या राहाचा फोटो व्हिडिओ सोशल मिडीयावर येताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.