मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कंगनाने थेट महिला आयपीएस अधिकाऱ्याशी ‘पंगा’ घेतला आहे. कंगनाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आयपीएस अधिकारी रूपा मुद्गल (IPS Roopa) यांच्यावर टीका केली आहे. कंगनाने रूपा यांना पोलीस खात्यावरचा धब्बा म्हटले आहे. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे (Actress Kangana Ranaut Demands Suspend IPS Roopa Moudgil).
कंगना रनौत सध्या बऱ्याच वादांमध्ये अडकली आहे. सध्या भावाच्या लग्नात व्यस्त असणाऱ्या कंगनाने या सगळ्यातून वेळ काढत ट्विटर अकाऊंटवरून रूपा मुद्गल यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. ‘रूपा मुद्गल यांचा हा डाव कदापि पूर्ण होऊ देणार नाही’, असे ट्विट कंगनाने केले आहे.
She should be suspended, such cops are a shame in the name of police force #ShameOnYouIPSRoopa we can’t let her get her evil ways #BringBackTrueIndology https://t.co/3rmraOW2lv
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2020
14 नोव्हेंबर रोजी रूपा मुद्गल यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की फटाके हे भारतीय परंपरेचा भाग नाहीत, त्यांचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात केलेला नाही. आयपीएस अधिकारी रूपा मुद्गल यांच्या या ट्विटनंतर त्यांच्यात आणि लोकप्रिय ट्विटर हँडल ‘ट्रू इंडोलॉजी’ यांच्यात वाद झाला. आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या या वादामुळे ‘ट्रू इंडोलॉजी’चे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले. ज्यावर ट्रू इंडोलोजीचे फॉलोअर्स संतप्त झाले आणि त्यांनी रूपा मुद्गल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
या वादात आता अभिनेत्री कंगना रनौतने देखील उडी घेतली आहे. कंगनाने या विषयावर ट्विट करून लिहिले की, ‘तिला निलंबित केले पाहिजे. असे अधिकारी पोलीस खात्यावर धब्बा आहेत.’ (Actress Kangana Ranaut Demands Suspend IPS Roopa Moudgil)
Side effects of reservations, when unworthy and undeserving gets the power they don’t heal they only hurt, I don’t know anything about her personal life but I guarantee that her frustration is stemming out of her incompetence #BringBackTrueIndology https://t.co/BUrVm1Fjz3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2020
कंगना रनौत हिने मध्यंतरी बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.
अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्र न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
(Actress Kangana Ranaut Demands Suspend IPS Roopa Moudgil)