मुंबई : ‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेमुळे नावारुपास आलेली अभिनेत्री मोना सिंह विवाहबंधनात अडकली आहे. दाक्षिणात्य बॉयफ्रेण्ड श्यामसोबत शुक्रवारी मोनाचा विवाह सोहळा (Actress Mona Singh Wedding) पार पडला.
या लग्न समारंभाला मोनाचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मोनाचे लाल लेहंग्यातील फोटो अभिनेता गौरव गेरा, अभिनेत्री रक्षंदा खान यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मोनाच्या लग्नाची गुड न्यूज समोर येताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पंजाबी पद्धतीने मोना आणि श्याम यांचा विवाहसोहळा (Actress Mona Singh Wedding) पार पडला. 38 वर्षीय मोना सिंह गेल्या वर्षभरापासून श्यामसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मोनाचा पती श्याम हा इन्व्हेसमेंट बँकर असल्याची माहिती आहे.
‘मिशन ओव्हर मार्स’ या वेब सीरिजमध्ये मोना नुकतीच झळकली होती. याआधी तिने कहने को है हमसफर, ये मेरी फॅमिली सारख्या वेब सीरिजही गेल्या वर्षी केल्या होत्या. राधा की बेटिया कुछ कर दिखायेगी, क्या हुआ तेरा वादा यासारख्या मालिका, थ्री इडियट्स सारख्या चित्रपटातील भूमिकांमुळे ती गाजली. ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची ती विजेती होती.
‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतील चष्मीष लूकमुळे मोना उत्सुकतेचा विषय ठरली होती. मालिकेच्या सुरुवातील मोना सिंह प्रत्यक्षात कशी दिसते, याविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यानंतर सुरवंटाचं फुलपाखरु झालं आणि मोनाचा खरा लूक समोर आला. 2003 मध्ये सुरु झालेल्या एकता कपूरच्या या मालिकेने तीन वर्ष तूफान लोकप्रियता मिळवली होती. Actress Mona Singh Wedding