पुण्यात अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक

| Updated on: Feb 09, 2020 | 10:54 PM

हिंदी सिनेमात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला पुण्यात सोन्याच्या अंगठ्या चोरताना अटक करण्यात आलं आहे

पुण्यात अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक
Follow us on

पुणे : हिंदी सिनेमात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला पुण्यात सोन्याच्या अंगठ्या चोरताना अटक करण्यात आलं आहे (Actress arrested for stealing). थेट अभिनेत्रीलाच चोरी करताना रंगेहाथ पकडल्याने पुण्यात एकच खळबळ माजली आहे. पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. स्नेहलता पाटील असं या आरोपी अभिनेत्रीचं नाव आहे. तिला सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

स्नेहलता पाटील हिने याआधी तीन हिंदी सिनेमांमध्ये काम केल्याची माहिती आहे. आरोपी अभिनेत्री पुण्यातील कॅम्प परिसरात एनआयएबीएम रोडवरील क्लोअर प्लाझा मॉलमध्ये एका ज्वेलरीच्या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने गेली. त्यावेळी तिने सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्या.

चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिला अटक केली. सीसीटीव्हीत आरोपी अभिनेत्री दुकानदाराशी अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलताना दिसत आहे. ती दुकानदाराला वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या दाखवण्यास सांगते. दुकानदार अंगठ्या दाखवण्यात गुंग असतानाच आरोपी अभिनेत्री चलाखीने सोन्याच्या अंगठ्या चोरताना दिसत आहे. तिच्यावर सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याचा आरोप आहे.

संबंधित व्हिडीओ:


Actress arrested for stealing