मुंबई : माझी एक्स गर्लफ्रेण्ड पळवल्याचा खट्याळ आरोप बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने ‘आशिकी 2’ फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरवर केला होता. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी आदित्यने या दाव्यावर मौन सोडलं आहे. रणवीरसोबत ब्रेक अप झाल्यानंतर अनेक महिन्यांनी आम्ही डेट करायला लागलो, असं आदित्य म्हणाला. (Aditya Roy Kapur denies stealing Ranveer Singh’s ex girlfriend in college)
कॉलेज डेजमध्ये आदित्यने माझी एक्स गर्लफ्रेण्ड पळवली होती, तो गर्लफ्रेण्ड-स्टीलर आहे, असा गमतीशीर आरोप रणवीर सिंहने ‘नो फिल्टर नेहा सिझन 2’ या अभिनेत्री नेहा धुपियाच्या रेडिओ चॅट शोमध्ये 2017 साली केला होता. आदित्य आणि रणवीर एकाच महाविद्यालयात शिकत होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना रणवीरने आदित्यची गुगली घेतली होती.
रणवीर काय म्हणाला होता?
“आदित्य म्हणजे ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रत्येक मुलीची फँटसी होता. एका मुलीवर माझा जीव होता, जी आता एका मुलाची आई आहे. तिच्या मागे मी अक्षरशः वेडा होता. चार-पाच वर्ष मी तिच्या मागे होतो. आम्ही रिलेशनशीपमध्ये होते. आणि एके दिवशी तिने ब्रेक अप केलं. त्याचं कारण एका आदित्य रॉय कपूरसोबत डेट करण्यासाठी” असा किस्सा रणवीर सिंहने ‘नो फिल्टर नेहा सिझन 2’मध्ये 2017 साली केला होता.
आदित्यने अखेर रणवीरच्या आरोपांवर ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत तोंड उघडलं. “रणवीर आपल्या हार्टब्रेकविषयी सांगताना नको तितका नाटकी झाला होता. मला माहित नाही, त्याला काय वाटत असेल. पण मी त्याची एक्स गर्लफ्रेण्ड पळवली नव्हती. त्यांच्या ब्रेकअपच्या आठ महिन्यांनंतर आम्ही डेटिंग सुरु केलं” असं आदित्य म्हणाला.
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी दोन वर्षांपूर्वी लगीनगाठ बांधली. संजय लीला भन्साळींच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ सिनेमाच्या सेटवर दोघं प्रेमात पडले. त्यानंतर बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यासारख्या सिनेमात ते एकत्र झळकले. इटलीमध्ये 14 नोव्हेंबर 2018 रोजी ते विवाहबंधनात अडकले.
रणवीर आता विश्वचषक विजेत्या टीम इंडियावर आधारित 83 या सिनेमात दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेत दीपिका झळकणार आहे. (Aditya Roy Kapur denies stealing Ranveer Singh’s ex girlfriend in college)
संबंधित बातम्या :
मर्सिडीजला बाईक घासली, कारबाहेर उतरुन रणवीरने…
(Aditya Roy Kapur denies stealing Ranveer Singh’s ex girlfriend in college)