आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी खुशखबर, मानधनात 16 हजारांची वाढ

| Updated on: Sep 17, 2020 | 12:17 AM

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन 24 हजारांवरुन थेट 40 हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अजित पवार यांनी घेतला. (Adivasi  medical officers payment Increase on Ajit Pawar)

आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी खुशखबर, मानधनात 16 हजारांची वाढ
Follow us on

मुंबई : राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढवण्यात आले आहे. गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन 24 हजारांवरुन थेट 40 हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. (Adivasi  medical officers payment Increase on Ajit Pawar)

‘मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यां’च्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागातील साधारण सहा ते दहा गावांना सेवा देतात.

या दौऱ्यात ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता आणि कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करत असतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत.

सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी बहुमोल योगदान देत आहेत. मानसेवी वैद्यकीय अधिकारीही दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात 24 हजारांवरुन थेट 40 हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ राज्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे.

राज्यातील आरोग्य विभागासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे, मात्र रुग्णांची सेवा करताना हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कडक सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. (Adivasi  medical officers payment Increase on Ajit Pawar)

संबंधित बातम्या : 

राज्यात पोलिसांची तब्बल साडेबारा हजार पदं भरणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

मराठा आरक्षणाबाबत लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत निर्णय